मनाचा हो काय भरोसा
कधी काय वाटेल त्यास ।
करेल काय विचार कधी
डोळ्यापुढे फक्त आभास ।
रडेल कधी डोळ्यात अश्रू
कठीण होतो एकेक श्वास ।
नको नको ते हवे सारेच
त्यासाठीच मग लागे ध्यास ।
नकळत दूर मग होते सारे
उरले सुरले जाते लयास ।
Sanjay R.
मनाचा हो काय भरोसा
कधी काय वाटेल त्यास ।
करेल काय विचार कधी
डोळ्यापुढे फक्त आभास ।
रडेल कधी डोळ्यात अश्रू
कठीण होतो एकेक श्वास ।
नको नको ते हवे सारेच
त्यासाठीच मग लागे ध्यास ।
नकळत दूर मग होते सारे
उरले सुरले जाते लयास ।
Sanjay R.
आली आली दिवाळी आली
आनंद उत्साह फुलला गाली ।
नवीन कपडे नवीन साडी
काय काय घ्यायचे यादी झाली ।
चिंटू मीनटू झालेत तयार
पलटण सारी बाजारात गेली ।
दिवळी असूनही बाजार थंड
महागाईने तर हो खुशीच नेली ।
Sanjay R.
दाटले डोळ्यात अश्रू
परी थेंब एक गळेना ।
ओठात थांबले शब्द
जिव्हा ही का वळेना ।
क्षण दुःखाचे भोगतो
नशिबाचे का कळेना ।
भावना ही या सरल्या
पीडा पाठची टळेना ।
शोधतो सुख दुःखात
का मज तेही मिळेना ।
दिले दुःखच मी पेटवून
तरीही का ते जळेना ।
Sanjay R.
टोचला काटा माझ्या पायात
काढू कसा मी तर वाटेत ।
चालता येईना मज आता
हात घ्या राया थोडा हातात ।
सलतो कसा हो तो छातीत
केलंय घर त्यानं पायात ।
उठु ना देई तो बसू ना देई
लक्षच माझे हो त्याच्यात ।
कुणीतरी काढा हळूच जरा
आसवं आलेत ना डोळ्यात ।
उशीर होतोय हो जायाला
अडकले मी या काट्यात ।
Sanjay R.