नाविक मी या नौकेचा
जीवन हे अथांग सागर ।
दूर शोधतो मी तो किनारा
पोटाला हवी एक भाकर ।
Sanjay R.
देऊ नकोस वेदना
करू किती मी सहन ।
झाले दुःख अपार
होईल कधी हे दहन ।
वेचतो आता मी
माझ्यासाठीच सरण ।
नाही विश्वास उरला
झाले सुखाचे हरण ।
अंतरात बघ वाकून
तिथे दुःखाचे भरण ।
भरला कुंभ शिगेला
उरले आता मरण ।
Sanjay R.
सोसतो मीच का वेदना
मनात या दुःख किती ।
घाव जखमांचे हे खोल
भळभळते रक्त किती ।
हळूच घाल तू फुंकर
अंतरात ती जागा रीती ।
आस अजून नाही सरली
बघतो मी तुझ्यात प्रीती ।
Sanjay R.
नवरात्रीचे तर नऊ रंग
होतो गरभा होऊन दंग ।
कुणी खेळतो घेऊन दांड्या
नवा उल्हास नवा उमंग ।
भाव भक्तीचा मेळ सारा
उठतो मनात एक तरंग ।
आनंदाला येते उधाण
राधा नाचे सोबत श्रीरंग ।
Sanjay R.
मनातले तुझ्या
का मज कळेना ।
जाऊ कसे दूर
पाऊल वळेना ।
साथ जन्माची
आठवण सुटेना ।
ओढ मनातली
माझ्या मिटेना ।
Sanjay R.