Wednesday, September 29, 2021

मुक्ती - राणी भाग नऊ

      राणी वडील गेल्या पासून थोडी शांत झाली झाली होती. तिला सारखी आई आणि वडील यांची आठवण यायची. वडिलांचे विक्षिप्त वागणे आई चा आजार. सम्पूर्ण कुटुंबाची होणारी परवड. उपाश्यापोटी ते काढलेले दिवस. सारच तिला आठवायचं. मग ती अजूनच अस्वस्थ व्हायची. वडील का तसे वागत होते. याचे ती उत्तर शोधायचा प्रयत्न करायची. पण ते एक नेहमीसाठी तिच्यापुढे प्रश्नचिन्ह होऊन पुढे राहायचे. कोणी काही सांगेल का ते तसे का होते. जर ते तसे होते तर मरताना इतके प्रेमळ मायाळू का वागले. का आपली इतकी आठवण करत होते. आपली भेट होईपर्यंत ते कुठली आस मनात ठेवून ते जिवंत होते. आपली भेट होताच आपल्या मांडीवरच त्यांनी का प्राण सोडले. विविध प्रश्न तिच्या डोक्यात गुंता करत होते. उत्तर तिलाही माहीत नव्हते. आई ही तिच्याशी बा बद्दल कधीच काही बोलली नव्हती. आई आणि बा कधीच त्याना तिने सोबत बसून बोलताना बघितले नव्हते. बा फक्त झोपायला तेवढा घरी यायचा. सकाळ होताच निघून जायचा. परत यायचा तो दारूच्या नशेतच असायचा. का तो असे करायचा. राणीला काहीच कळत नव्हते, सुचत नव्हते.
तिने आपल्या मनातले सारे प्रश्न नाईकांकडे मांडले. नाईकांनाही ते एक कोडेच वाटले. त्यानी राणीला समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणाले. राणी विसर आता सगळं. त्यांचं आयुष्य ते जगलेत. तुझ्यापुढे आता भविष्य आहे. ते तू आनंदात काढ. तसेही ते दोघेही आता जिवंत नाहीत तुला उत्तर द्यायला. का स्वतःला असा ताप करून घेतेस. आठवण येणे तर स्वाभाविकच आहे परंतु, सारखा तोच तो विचार करणे बरे नाही. तू स्वतःच आजारी पडली तर मग आमच्याकडे कोण बघणार. खरच आता तू ते सगळं विसरून जायला हवे. नाईकांचे ते बोलणे राणीलाही सुटायचे. ती मग त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्नही करायची. पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तिला तो तिच्या बा चा शेवटचा क्षण आठवायचा आणि मग ती त्या सगळ्या विचारात गुरफटून जायची.

       बा च्या तेराव्या दिवसाला तिने नैवेद्य काढून गाईला अर्पण केला. पूजा केली. नाईकांनी काही वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या साऱ्या वस्तू ती त्या राहत असलेल्या गरिबांना वाटायला घेऊन जाणार होती. नाईक त्यासाठी आज ऑफिसमधून लवकर घरी परत येणार होते. ती नाईकांची वाटच बघत होती. तेवढ्यात नाईक आलेत. दोघेही मिळून ते साहित्य घेऊन तिच्या त्या घराच्या भागात पोचले. त्यांनी घरोघरी जाऊन  सगळ्या वस्तू तिथल्या लोकांना वाटून दिल्या. बा चा निरोप घेऊन येणारे ते गृहस्थही तिला भेटले. तिने त्यांना कधीतरी वेळ मिळेल तेव्हा घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि ते दोघेही घरी परत आले.

       आज तिला थोडे बरे वाटत होते. ती तिकडे राहत असताना तिथल्या लोकांनी तिच्या बा आईला जी मदत केली होती. तिला तिथे जे प्रेम मिळाले होते त्याची परतफेड तर शक्य नव्हती, पण तिनेही त्यांच्यासाठी काही केल्याचे समाधान तिला वाटत होते. तिथे राहणारी सगळीच कुटुंब गरीब रोज दिवसभर कष्ट करून पोट भरणारी होती. त्यामुळे त्यांना दिलेल्या त्या वस्तू त्यांच्या कामात येणार होत्या.  तिचे सम्पूर्ण बालपण तिथल्या त्या लोकांच्या सानिध्यातच गेले होते. तिथले लोक सगळे गरीब जरूर होते. पण वाईट बिलकुल नव्हते. त्यानाही आपला आत्मसन्मान खूप मोठा वाटायचा. त्यासाठी ते स्वतःला खूप जपत होते. तेच संस्कार राणी ला मिळाले होते . कष्ट इमानदारी आणि आत्मसंमान सगळेच गुण राणीने  पूर्णतः अंगिकारले होते.स्वभाव तर मुळातच तिचा शांत,साधा, सरळ, सालस होता. नाईकांना म्हणूनच राणी आवडत होती.

      हळू हळू दिवस जात होते. आता राणीही आई वडिलांचे दुःख विसरत होती. घरात कामाच्या व्यापात तिचा वेळ कसा निघून जायचा ते तिला कळत नव्हते. नाईक आणि मूलं ही आता राणी सोबत छान मिक्स झाले होते. आता सगळे व्यवस्थित सुरू होते. असेच एक दिवस सायंकाळी सगळे आनंदात गप्पा करत होते. तेवढ्यात दरवाजावर खटखट झाली. राणीने दरवाजा उघडला तर तेच गृहस्थ दारात उभे होते. त्यांनीच राणीच्या वडिलांचा शेवटचा निरोप आणला होता. तोवर नाईकही दारात आले. नाईकांनी त्याना घरात बोलवले.  राणी त्यांच्या साठी चहा ठेवायला आत गेली. नाईकांनी त्यांना बसवले आणि येणाचे कारण विचारले. त्यांनी सांगितले काही कामा निमित्त ते त्या भागात आले तर राणी ची आठवण झाली म्हणून सहज आल्याचे सांगितले. नाईक त्यांच्या सोबत गप्पा करत होते. तेवढ्यात राणी त्यांच्याकरिता चहा घेऊन आली. त्याना राणीला बघून बरे वाटले होते. मग राणीनेच    त्यांना विचारले काका मला एक प्रश विचारायचा होता.  विचारू की नको सुचत नाही आहे. मला विचारायचे होते की माझे बा असे का वागायचे ते घरी कधीच नव्हते बोलत फक्त रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे असे का करत होते ते.  आणि आई  माझ्यावर खूप प्रेम करायची पण बा त्याने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही कधी बोलत पण नव्हता. पण अंत समयी काय झाले की तो मला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देऊन गेले.

      राणीचा प्रश्न ऐकून त्या गृहस्तांचे डोळे पाणावले. राणी बेटा तू एक वर्षाची असतानाची गोष्ट असेल. बेटा तुझी एक बहीण होती. ती तुझ्या पेक्षा मोठी होती दोन वर्षांनी. तुझे बा चांगल्या नोकरीत होते. घर दार सगळंच चांगलं होत. पण एक दिवस तुझे बा तुझ्या बहिणीला घेऊन कुठे बाहेर निघाले होते. ती त्यांचा हात पकडून चालत होती. पण अचानक तिने त्याचा हात सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या फुगे वाल्याकडे धाव घेतली आणि नेमक्या त्याच वेळी येणाऱ्या बस ने तिला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तुझ्या बा ला त्याचे खूप दुःख झाले इतके की त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्या दिवसापासून तो कधीच एकही शब्द बोलला नाही. त्याची वाचाच गेली. नोकरी गेली पैसा सम्पला. मग ते इकडे आमच्या भगत रहायला आले. या दोन्ही घटनांचा तुझ्या आईवरही फरक पडला ती पण आजारी राहायला लागली. तरी त्या माउलीने सगळे सांभाळले. तुला मोठे केले. तुझा बा बघ संतुलन गमावलेले असतांनाही शेवटी मात्र त्याला तुझी आठवण झाली आणि घरी परत आला. सारखे तुला आठवत राणी राणी करत होता. बेटा बरेच झाले. तू येऊन त्याला जवळ घेतलंस. मुक्त झाला तो या जन्मतून. नाही तर त्याचा आत्मा तुझ्यासाठी भटकत राहिला असता.

       ती गोष्ट ऐकून राणी खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून आसवे गळत होती. बराच वेळ झाला होता. ते काका आता निघून गेले होते. राणीला आता खूप बरे वाटत होते कारण तिचे बा या जन्मतून मुक्त झाले होते.
Sanjay R.




बाप - राणी भाग आठ

      आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे.  राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.

       राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.

       आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले . तर समोर तिच्या  जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं   वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.

        राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.

        नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत संस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते.
Sanjay R.


" चुकीला नाही माफी "

चुकीला नाही माफी
बरोबरला कुठे टॉफी ।
स्वतःच व्हायचे खुश
गालावर थोडी लॉफी ।
गुणगुणायची एक ओळ
जसा गायचा तो रफी ।
मनातच स्वतः घ्यायची
मोठी सुवर्णाची ट्रॉफी ।
मनच सांगते मनाला
चुकीला नाही माफी ।
Sanjay R.



" आनंद थोडा जगायचे "

सारून दुःख बाजूला
आनंद थोडा जगायचे ।
बडबड गीत गाऊन मग
खुदकन गालात हसायचे ।
रडायला नाहीत डोळे
त्यातून तिरके बघायचे ।
गाल थोडे फुगवूनच
मस्त पैकी रूसायचे ।
जग बघा सुंदर किती
कशाला दुःख भोगायचे ।
Sanjay R.

Tuesday, September 28, 2021

" दूर किती तो तारा "

दूर किती तो तारा
चमचमतो बिचारा ।
मधेच येऊनि नभ
करी पावसाचा मारा ।
जातो भिजवून चिंब
वाटे मज तो इशारा ।
गन्ध प्रेमाचा तयात
आभास किती न्यारा ।
Sanjay R.