Monday, September 20, 2021

" नाचे मोर मनात "



नाचे मोर मनात
हर्ष उठे तनात ।
उल्हास होई जागा
आनंद गगनात ।
सोडून दुःख आता
हसायचे क्षणात ।
सुख दुःख येतीजाती
हवे काय जीवनात ।
Sanjay R.

Saturday, September 18, 2021

" काय बोलायचं "

बोलायला नको विषय
हवे नको ते बोलायचे ।
गुपित मनातले सारेच
उघड करून सोडायचे ।
वाणी तारी वाणीच मारी
नाही कुणाला कशाचे ।
शब्दच करी कधी अनर्थ
मात्र मग चूप बसायचे ।
Sanjay R.

Friday, September 17, 2021

" ज्योत जळते दारात "

उठले वादळ मनात
विखुरले स्वप्न क्षणात ।
आता शोधू कुठे विसावा
झालो परका का जनात ।

वाहतो एकटाच मी ओझे
नाही उरले त्राण उरात ।
वाटही दूर किती अजून
वाटे वहात चाललो पुरात ।

मंद मंद झालेत श्वास
प्राण कंठाशी आले सुरात ।
उलटून देह हा पडला
आता ज्योत जळते दारात ।
Sanjay R.

Thursday, September 16, 2021

" चहा कॉफी कामाची "

चहा कॉफी किती कामाची
किमतीला कमी दामाची ।
थकला असो वा भागला
बुटी जणू किती कामाची ।

मैत्री असो वा नाते असो
घट्ट मिठी तिच्या स्वादाची ।
आठवण येता हवीच वाटे
दुनिया सारी तिच्या नादाची ।

वेळ असो वा नसो कुणाला
देई फुरसत काही क्षणाची ।
गोडवा तर इतका तिचा
मिटवते दरी दोन मनाची ।
Sanjay R.



Wednesday, September 15, 2021

" किरण एक आशेचा "

नको ते विपरीत सारे
का हे असे घडते ।
सांभाळायचे  मन कसे
जाऊन तिथेच जडते ।

आठवणींचा डोंगर विशाल
करू किती मी पालथा ।
त्राणच उरले नाहीत
एकट्याने येईल का चालता ।

क्षणनी क्षण अवघड  किती
डोळे असतात वाटेवर ।
थांबत नाही एक थेंब
जणू लाटच येते गालावर ।

हुंदकाही कुठे आवरतो
आवेग दुःखाचा सोसेना ।
तुझ्याविना जगू कसे
काहीच मजला सुचेना ।

ये परत तू सोडून सारे
नको विचार कशाचा ।
रोज बघतो सूर्य नवा
हवा किरण एक आशेचा ।
Sanjay R.