Friday, September 3, 2021

" विसरू कसे मी सांग "

विसरू कसे मी सांग
कसे फेडील मी पांग ।
उपकार तुझे मजवर
मोजू किती मी सांग ।
पडेल जन्म हा अपुरा
नाही ही भरणार रांग ।
सोडू कसे मी तुजला
प्रेम तुझेची अथांग ।
आईविना लेक पोरका
विसरेल कसा मी सांग ।
Sanjay R.


Thursday, September 2, 2021

" गूढ अंतराचे "

गूढ अंतराचे कळेना
अडकले मन वळेना ।
मनात विचार किती
कधी कशाशी जुळेना ।
क्षणात बदलते कसे
कधी कुणास छळेना ।
करतो मी सहन सारे
भोग नशिबाचे टळेना ।
Sanjay R.





Wednesday, September 1, 2021

" सांगा काय करायचं "

झालं ते आता विसरायचं
रुसणं फुगण सोडायचं ।

गालात थोडं हसायचं
पुन्हा नाही रुसायचं ।

मागे कशाला वळायचं

पुढचंच सारं बघायचं ।

मार्ग हा कुठे सरतो
अजून बरंच चालायचं

करणार काय आता
नाही मनात ठेवायचं ।

घेऊ वाटून सुख दुःख
हसत हसत जगायचं ।

जेव्हा येईल वेळ तेव्हा
बघू ना काय करायचं ।

टाळलं कुणाला मरण
त्यालाही आहे थकवायचं ।
Sanjay R.


Tuesday, August 31, 2021

" येईल कधी ती वेळ "

येईल कधी ती वेळ
नकळे कधी कुणास ।
हळूच देऊन जाते
क्षणभर सुख मनास ।
लाभतो आनंद किती
दिसे गालावर सुहास ।
जीवनातले क्षण तेच
नसे दुःखाचा आभास ।
वाटे सार्थक जगण्याचे
भरतो सुखाचे श्वास ।
कधी तुटतो विश्वास
होतो कती मग त्रास ।
जीवनाचे रंग किती
चाले सुखाचा प्रयास ।
निखळतो तारा जेव्हा
असे तोची अंतिम श्वास ।

Sanjay R.









Monday, August 30, 2021

" कृष्ण कान्हा "

देवकीचा तान्हा
यशोदेचा कान्हा ।

गोपिकांचा मदन
राधिकेचा मोहन ।

मटके तो फोडी
गोपींना तो छेडी ।

कंस ज्याचा मामा
नाही केली क्षमा ।

सुदामाचा तो सखा
द्रूपदीचा पाठीराखा ।

हरले रती महारती
अर्जुनाचा सारथी ।

धर्मयुद्धात तो पार्थ
दिला जीवनास अर्थ ।
Sanjay R.