Wednesday, August 11, 2021

" किरण आशेचा "

मनात कायम असे
किरण आशेचा ।
सदा आपल्या तोऱ्यात
असर तो नशेचा ।
मनात हाव वसलेली
धागा तो कशाचा ।
डाव फसतो कधी मग
येई राग हशाचा ।
Sanjay R.


" नशिबाचे फेरे "

काय रेखाटू या पाटीवर
काळी पाटी काळा खडू ।
नशीबाचेच फेरे उलटे 
जीवनात या सारेच कडू ।
टीचभर या पोटासाठी
हाता पायास किती छेडू ।
कोरभरच हवी भाकर
नको पेढे नको लाडू ।
अश्रू डोळ्यातले आटले
सांगा आता कसा रडू ।
Sanjay R.


Friday, August 6, 2021

" डोळ्यात थेंब आसवांचे "

आठवणींच्या डोहात
विचारांचे जाळे ।
डोळ्यात थेंब आसवांचे
पापणीच्या आड तळे ।
मन होते जेव्हा उदास
काय कुणास कळे ।
अंतरात धगधगते आग
मन मनात जळे ।
चन्द्र डोकावतो आकाशात
अंगणात त्याच्या खळे ।
चांदण्या दुरून हसतात
बघूनक मजला छळे ।
Sanjay R.

Thursday, August 5, 2021

" शोधू कुठे मी तुला "

विशाल या गर्दीत
शोधु कुठे मी तुला ।
हरवलेला बंध
काय मिळेल मला ।
Sanjay R.



" काय मनात माझ्या "

काय मनात माझ्या
हवे वाटे आभाळ ।
नकोच कधी रात्र
फक्त व्हावी सकाळ ।
उजेडाशी ही  कशी
जुळली इथे नाळ ।
रात्र नाही वाईट
घेऊ कसा मी आळ ।
चन्द्र आणि चांदण्या
करती शांत जाळ ।
रजनीचे गळ्यात
प्रकाश टाके माळ ।
Sanjay R.