काय रेखाटू या पाटीवर
काळी पाटी काळा खडू ।
नशीबाचेच फेरे उलटे
जीवनात या सारेच कडू ।
टीचभर या पोटासाठी
हाता पायास किती छेडू ।
कोरभरच हवी भाकर
नको पेढे नको लाडू ।
अश्रू डोळ्यातले आटले
सांगा आता कसा रडू ।
Sanjay R.
काय मनात माझ्या
हवे वाटे आभाळ ।
नकोच कधी रात्र
फक्त व्हावी सकाळ ।
उजेडाशी ही कशी
जुळली इथे नाळ ।
रात्र नाही वाईट
घेऊ कसा मी आळ ।
चन्द्र आणि चांदण्या
करती शांत जाळ ।
रजनीचे गळ्यात
प्रकाश टाके माळ ।
Sanjay R.
कोण येतो नि
कुठे तो जातो ।
रिकामाच येतो
नि काय नेतो ।
मी मी करतो
कुठे तो उरतो ।
कधी हसतो
डोळे पुसतो ।
श्वास भरतो
मधेच हरतो ।
इथेच जगतो
इथेच मरतो ।
माणूस असतो
माणूस नसतो ।
Sanjay R.