काय देऊ तुला
नि घेऊ मी मला ।
मनात लोभ हा
कुठे कमी झाला ।
प्रेम कुठे व्यर्थ
लावू कसा ताला ।
मी तुझा तू माझी
मन दिले तुला ।
मन तुझे हवे
नको काही मला ।
Sanjay R.
येता आभाळ आकाशात
भाव बदलले चेहऱ्यावरचे ।
तळतळ करणारे उष्ण वारे
शीतल स्वरूप झाले त्यांचे ।
सर सर आल्या सरी धावून
मग वाहू लागले पाट पाण्याचे ।
निसर्गानेही मग रूप बदलले
अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।
दूर बसून मी कौतुक बघतो
दिवस सुंदर किती पावसाचे ।
Sanjay R.
नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही
असते काही अटळ ।
विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.