येता आभाळ आकाशात
भाव बदलले चेहऱ्यावरचे ।
तळतळ करणारे उष्ण वारे
शीतल स्वरूप झाले त्यांचे ।
सर सर आल्या सरी धावून
मग वाहू लागले पाट पाण्याचे ।
निसर्गानेही मग रूप बदलले
अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।
दूर बसून मी कौतुक बघतो
दिवस सुंदर किती पावसाचे ।
Sanjay R.
Wednesday, July 28, 2021
" भाव बदलले चेहऱ्यावरचे "
Tuesday, July 27, 2021
" काय करावं आता "
देईल तुला म्हणून मी आता
काय करावं तो विचार करतो ।
ठेवलं आहे मी जपून काही
ते सारच मी आता तुलाच देतो ।
आवडेल नावडेल विचारच नाही
हास्य चेहऱ्यावरचेच मी आठवतो ।
येऊ देना परत तेच तसेच दिवस
आठवून सारे मी मलाच हसवतो ।
Sanjay R.
Monday, July 26, 2021
" कशास म्हणू मी माझे "
आहे काय कुणाचे इथे
कशास म्हणू माझे इथे ।
असे रिकामे हात येताना
बघा रिकामेच जाताना ।
घेऊनिया मूठभर थोडे
ओंजळभर द्यावे सारे ।
थोडे हसणे थोडे रडणे
सुख दुःखात आहे जगणे ।
Sanjay R.
Sunday, July 25, 2021
" भावनांचा होतो खेळ "
नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही
असते काही अटळ ।
विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.
Saturday, July 24, 2021
" बंध अनोख्या नात्याचे "
शोधून कुठे मिळतील
बंध अनोख्या नात्याचे ।
जन्मोजन्मीचा तो धागा
ऋणानुबंध जीवनाचे ।
सुख असो वा असो दुःख
सोबत सदा असायचे ।
सावलीही सोडेल साथ
पण नाते कुठे तुटायचे ।
ठेवा हा जन्मोजन्मीचा
हळुवार त्यास जपायचे ।
होईल मग अजून घट्ट
त्यालाच नाते म्हणायचे ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)