Friday, July 2, 2021

" घे भरारी "

नको थकुन जाऊस असा
 घे भरारी विसरला कसा ।

जीवनाचा तर एकच सिद्धांत
सोडायचे नाही काहीच मधात ।

प्रसंग कठीण तर येतील वाटेत
पोहायचे आहे खळखळ लाटेत ।

वाटेत टोचतील दुःखाचे काटे 
मयाजाळ ते आहे सारेच खोटे ।
Sanjay R.



Thursday, July 1, 2021

" जगन्यासाठी धळपळ "

दिसभर जगन्यासाठी
चालते त्याची धावपय ।
रक्त आटतवरी काम
कराच लागते ना लय ।

घरी बुढा बुढी बिमार
तान्ह पोरगं रडते भाय ।
बायको बी कावली आता
म्हने पाहू मी काय काय ।

पैसा न्हाई यक खिशात
सांगा कराव आता काय ।
किती मराव सांगा म्याच
लय दुखते राजा पाय ।

यकदाचं मरन यु दे
सांगतो तूले मरिमाय ।
कोनता पडते फरक
जगून उपेग भी काय ।

जगन्याची धळपळ हे
कराच लागन का नाय ।
उठना दादा आता तरी
मालक बोबलन पाय ।
Sanjay R.




Wednesday, June 30, 2021

" करू नकोस वाद "

करू नकोस तू वाद
देईल तुला मी साद ।

तुला आवडेल सारे
देशील मग तू दाद ।

शब्द नि शब्द मग
ठेवशील तूच याद ।

विसर तू मनातले
दे सोडून हा नाद ।

जुनाच आहे हाही
भांडणाचा प्रवाद ।

करू नकोस तू वाद
येईल तुलाच याद ।
Sanjay R.


" वळून नको बघुस "

वळून नको बघूस
पुढेच जायचे आहे ।
येईल तुला कळून
पुढ्यात दगड आहे ।

पाऊल पुढे ठेवता
खळगा समोर आहे । 
जाईल तोल सांभाळ
आधार कसला आहे ।

जीवन हाच खळगा
जायचे तरून आहे ।
कठीण प्रवास सारा
सदा हसायचे आहे ।

कुणास अंत चुकला 
सत्यही इथेच आहे ।
माघार नकोच आता
जायचे अजून आहे ।

विचार कशाचा नको
दुःखात आनंद आहे ।
सुखाचा मार्ग वेगळा
हसणे हा छंद आहे ।
Sanjay R.


Tuesday, June 29, 2021

" वादळ "

वाटा जरी ओळखीच्या
येते कधीही वादळ
वाऱ्यासोबत होते मग
माणसांची पळापळ ।
उडवून नेतो सारेच
माजते नुसती खळबळ ।
होतो वारा शांत आणि
उरते फक्त हळहळ ।
Sanjay R.