Thursday, June 24, 2021

" ऋणानुबंध "

तुझ्या माझ्या नात्यात
एक अनोखा बंध ।
दरवळतो जीवनात
प्रीतीचा सुगंध ।
क्षण नि क्षण फुलतो
दरवळतो सुगंध ।
दुःख होते दूर आणि
मिळतो आनंद ।
हसवायचे तुला कसे
चाले त्याचा प्रबंध ।
बघायचे हास्य तुझे
लागला मज छंद ।
अंतरात बघ माझ्या
असतो तुझ्यात धुंद ।
जन्मोजन्मी असू दे
असाच ऋणानुबंध ।
Sanjay R.



Wednesday, June 23, 2021

" कसे ऋण फेडावे "

कसे हे ऋण फेडावे
आयुष्य परत जोडावे ।
पडला विसर तो कसा
का आपल्यात हे घडावे ।
तू सागर प्रेमाचा अथांग
वाटे मज त्यात डुबावे ।
होऊन तुझाच भक्त परत 
अंतरात तुझ्या मग शिरावे ।
तुजविण कोण मोठा इथे
वाटे भक्तीत तुझ्या जगावे ।
नाम तुझेच घेता घेता
डोळे शेवटचे मग मिटावे ।
कर्ताही तू करविताही तू
तुजविण मी कसे जगावे ।
Sanjay R.







Tuesday, June 22, 2021

" कळलेच नाही मला "

कळलेच नाही मला
काय हवे होते तुला
मागे पुढे फिरायचो
होऊन एक झुला ।
मर्जी होती ना तुझी
जपावे मीच तुला ।
अजूनही जपतो आहे
समजून घेना मला ।
नाते आहे हे प्रेमाचे
मनाने मीही खुला ।
मन तुझेही कोमळ
तूच माझ्या फुला ।
Sanjay R.




Monday, June 21, 2021

" किती करायचे सहन "

किती करायचे सहन
आहे ना प्रश्न गहन ।

रोज होतात वाद
पण परत देतात साद ।

मन होतं म्हणे मोकळं
सांगायचं कसं सगळं ।

मार्ग आता एकच
प्रश्नांची उत्तरं फेकच ।

नको प्रश्न नको उत्तर
मनही झाले पत्थर ।

चढू दे दिवस एकेक जरा
कालच्या पेक्षा होता बरा ।

भोगली आजवर हीच तऱ्हा
जीवनाचा तर हाच फेरा ।

येईल कधी जोरात वारा
नेईल उडवून पसारा सारा ।
Sanjay R.


Sunday, June 20, 2021

" बाबा "

बाबा म्हटलं की
आठवतो त्यांचा मार ।
शब्द होतात शांत
आणि शरीर होते गार ।
जीवनात बाबा म्हणजे
आयुष्याचा  तेच सार ।
असतो पाठीवर हात
मग कुठे कशाची हार ।
बोलणे कडक किती
शब्दांना त्यांच्या धार ।
सोबत असता त्यांची
काहीच वाटेना भार ।
झेलतील स्वतः सारे
प्रपंचातले प्रहार ।
करतो अनुकरण मी
जे होते त्यांचे विचार ।

बापाचाच असतो बघा
पगडा लेकरवर फार ।
हिरो असती बाबाच
नसे कशाची तक्रार ।
नाते बाप नि लेकाचे
वाटे बाकी सारे बेकार ।
लेकराची स्वप्न सारी
करतो बापच साकार ।
म्हातारपणी साथ लागे
देऊ नका तूम्ही नकार ।
Sanjay R.