Wednesday, April 21, 2021

" मन हे चंचल किती "

मन हे चंचल किती
क्षणात घेई भरारी ।
कधी इथे कधी तिथे
जगाची करते वारी ।

स्वप्नांच्या दुनियेत
येते मारून फेरी ।
थांबेना कुठे जरा
चलबिचलता सारी ।

गुंफते क्षण काही
थांबूनी कुठे जरी ।
फुलपाखरू जणू ते
घेते परत भरारी ।
Sanjay R.

Tuesday, April 20, 2021

" असह्य असतो एकटेपणा "

असह्य असतो किती एकटेपणा
भाव मनातले मी सांगू कुणा ।

बोलण्यातूनच तर व्यक्त होई
परस्परांशी किती आपलेपणा ।

एकटे एकटे तू करून टाकले
निष्ठुर किती आहेस तू कोरोना ।

दवाखान्यात ना औषध ना बेड
प्राणवायूही कसा तो मिळेना ।

जीवनच झाले आता दुर्धर फार
शव बघते वाट जागाही सापडेना ।
Sanjay R.


Monday, April 19, 2021

" नुसत्या तुझ्या असण्याने "

नुसत्या तुझ्या असण्याने
भिनतो कसा अंगात वारा ।
तुझ्या आठवणीनंही मज
सुखाचा वाटे सारा पसारा ।

सांगू तुझी मज सोबत कशी
जातो निघून दुःखाचा मारा ।
जीवन हे उन्हाळा पावसाळा
सोबत तुझी गार गार वारा ।

तुझ्या सवे दुःखाचे होते सुख 
वाटे जशा श्रावणातल्या धारा ।
हसणे तुझे कधी रुसणे तुझे
जसा मोर फुलवतो पिसारा ।

संसाराला  माझ्या जोड तुझी
भासे चंद्राचा शांत शीतल पारा ।
अथांग या सागरात सांगतो
आहेस तूच माझा किनारा ।
Sanjay R.


Sunday, April 18, 2021

" खरं काय ते सांगशील का "

काय खरं ते
सांगशील का ।
मनात काय ते
बोलशील का ।
वाट तुझी बघतो
परत तू येशील का ।
तुझ्याविना व्यर्थ सारे
जागा तु भरशील का ।
अंतरातली ओढ आता
स्वप्नपूर्ती करशील का ।
जीवनाच्या वाटेवर
साथ तू देशील का ।
Sanjay R.

Saturday, April 17, 2021

सांगा का हा माणूस असा

सांगा का हा माणूस असा
नाही त्याला स्वार्थ कुठला ।

दुसऱ्यासाठी झिजतो सदा
ध्येया पासून कधी न तुटला ।

दया माया हेच अस्त्र  त्याचे
मृदू वाणीतुन कधी न सुटला ।

म्हणती सारेच देवदूत आहे
असे नेहमी सत्कार्यात जुंपला ।

सांगा तोही माणूस कुठला
मोह मत्सर स्वार्थाचा पुतळा ।

उठे जीवावर कधी कुणाच्या
माणुसकीचा माणूस लुटेरा ।
Sanjay R.