Sunday, April 11, 2021

" थोडं तुझं थोडं माझं "

आहे फुलवायची ही
या संसाराची वेल ।
थोडं तुझं थोडं माझं
दोघेही करू प्रयत्न चल ।

एकाच चाकावर कशी
चालेल संसाराची गाडी ।
सोबतीने चालू आपण
असू दे कितीही उंच माडी ।

दिशा एक ध्येय एक
संसाराला आपली जोड ।
प्रत्येक दिवस आनंदाचा
आयुष्यच मग होईल गोड ।
Sanjay R.

Saturday, April 10, 2021

" नकळत डोळे पाणावले "

कोरोना आला 
आणि सारंच बदललं ।
कुणी बघा जरा
घर अंगण स्वच्छ झाडल ।
घरातल्या कामात
स्वतःलाही जोडलं ।
परिवारात आनंदी सारे
विपरितच हे घडलं ।
संवादातून झाली जवळीक
प्रेम प्रेमात पडलं ।
विनाकारण फिरणारे
घरातच बसले ।
लग्न समारंभ सारे
पन्नास लोकांत जुडले ।
मुखावर आला मास्क
वाचायचे कसे ते जाणवले ।
दुःखद बातम्या ऐकून
नकळत डोळे पाणावले ।
Sanjay R.


" हवा आता मास्क "

Friday, April 9, 2021

" दूर जाते ही वाट "

हिरवी हिरवळ दाट
दूर दूर जाते ही वाट ।
चिवचिव करती पाखरे
होताच नवीन पहाट ।
निसर्ग रम्य हे सारे
काय निसर्गाचा थाट ।
वळना वळणातून निघे
कुठे पठार कुठे घाट ।
चाले निरंतर प्रवास
तरी थकेना ती वाट ।
Sanjay R.

Thursday, April 8, 2021

" प्रेमाचा रंग अजून तोच "

कसे होते त्या काळातले प्रेम
आता सारखेच होते का सेम ।
नाही ठाऊक चाले कसा गेम
कोण केव्हा टपकेल नव्हता नेम ।

तो बघायचा आणि ती हसायची
नाकाला थोडंस मुरडायची ।
नजरेनं तिरक्या ती बघायची
मुद्दाम खोटं खोटं रुसायची ।

बोलायची तर सोयच नव्हती
पत्रातून मग ती व्यक्त व्हायची ।
मनातल्या भावना ती लिहायची
पत्र कशीबशी आपली पाठवायची ।

व्हायचा कधी गडबड घोटाळा
मित्रच सांगायचे पळा पळा ।
दूर बघ तिकडे येतोय साळा
भीतीने चेहरा व्हायचा निळा ।

आजकाल झाले सारेच ईझी
मेसेज पाठवून व्हायचे बिझी ।
सांगे आठवण येत होती ग तुझी
पण ब्याटरी चार्ज नव्हती माझी ।

प्रेमाचा रंग आहे अजून तोच 
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर होच ।
प्रेमाच्या पावतीला मिळते पोच
आवडते तिच्या गालावरची मोच ।
Sanjay R.