Wednesday, April 7, 2021

" ठरवून कुठे काय होते "

ठरवून कुठे काही होते का 
ठरवलेले कधी पूर्ण होते का ।

ठरवायचे आपण एक आणि
न ठरवलेले घडते दुसरेच ।

नकळत कधीतरी असेही होते
हवे ते काम आपोआप पूर्ण होते ।

नाशीबाचाच खेळ आहे सारा
कधी दुःख तर कधी सुखाचा मारा ।
Sanjay R.


Tuesday, April 6, 2021

" पैशाचा गंध "

इल्या आमचा एकदम भारी
त्याला आहे एकच छंद ।
झोपेत पण ओळखेल हो
कोऱ्या नोटांचा गंध ।
हुंदडेल तिथेच हादडेल
पैश्या मध्ये होतो धुंद ।
असू द्या ना म्हणतो
कितीही कशाचे निर्बंध ।
गती कामाची तुमच्या
करा ना थोडीशी मंद ।
पैसेच पैसे येतील म्हणे
फक्त मार्ग असू द्या रुंद ।
नाक दाबून तोंड उघडा
नाहीतर खात बसा कंद ।
मार पडला की म्हणे
कोणीही होतो बेधुंद ।
पकडून त्याला मग
करा पूर्ण आपला छंद ।
नोटा घेताना कोऱ्या
डोळे थोडे ठेवा बंद ।
करप्शन च्या मुद्द्यावर
सगळेच होतात अंध ।
घेऊन बघा ना पैसे
मिळतो किती आनंद ।
पैसा कसाही असो
सारखाच असतो  गंध ।
ओंजळभर का होईना
करायचा असाच प्रबंध ।
आयुष्यभर मग आपले
लिहीत बसा निबंध ।
Sanjay R.


Monday, April 5, 2021

" किती वाट मी पाहू "

किती वाट मी पाहू
कसे मनाला समजावू ।
काहूर हे या मनातले

सांग कसे मी शमवू ।
ये तू जरा कर ना त्वरा
सुखाने आयुष्य हे घालवू ।
Sanjay R.



Sunday, April 4, 2021

" आठवणी करती पाठलाग "

जाऊ कुठे पाहू कुठे
आठवणी करती पाठलाग ।
पुढे पुढे जायचे अजून
त्यातच शोधू या माग ।
खडतर हे जीवन किती
आठवणीही जीवनाचा भाग ।
कुणाकुणावर काढू किती
असलेला मनात राग ।
सुख दुःख तर येती जाती
जाग मित्रा तू जाग ।
Sanjay R.

Saturday, April 3, 2021

" कसे समजावू मी स्वतःला "

कुठे उरली माणुसकी
आहे कुणात आपुलकी ।

आहे जो तो स्वार्थी इथे
पैशाने होती व्यवहार जिथे ।

आचार विचार लोभी मन
विकून सारे  हवे फक्त धन  ।
निर्धनाला कोण विचारी ।
श्रीमंतच होतील तुमचे शेजारी ।

कसे समजावू मी स्वतःला 
मीही तोच ओळखतो कुणाला ।
Sanjay R.