रंग लाल लाल
हिरवा पिवळा ।
खेळे राधा संगे
कृष्ण सावळा ।
विसरून दुःख सारे
होतो ढवळा पिवळा ।
ओळखेल कशी ती
तिचाच तो मावळा ।
खेळ चाले रंगांचा
होऊनिया बावळा ।
उत्साही आनंदी
रंगाचा हा सोहळा ।
Sanjay R.
कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।
तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।
घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।
जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.
अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.
बघून वाट मी थकलो
हवा विसावा क्षणभर ।
मनात एकच आस आणि
होते लक्ष सारे वाटेवर ।
श्वासांनाही नव्हते कळत
जडला प्राण कुणावर ।
ज्योत ही विझली कधी
रात्रीला तो झाला जागर ।
गेले उडून प्राण जेव्हा
शब्दांचाच झाला गजर ।
Sanjay R.