Sunday, March 28, 2021

" अंतरात अनामिक ओढ "

कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।

तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।

घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।

जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.


Saturday, March 27, 2021

" ठेवले आहे जपून "

अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य  सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.


Friday, March 26, 2021

" रंग होळीचा "

यंदा होळीचे रंग खेळू नका
कोरोनाला घरात घेऊ नका ।

दूर दूर राहा दुरूनच पहा
रंगीत फुलांना देवावर वाहा ।

येतील परत होळीचा सण
आनंदाने मग खेळू आपण ।

सांभाळा थोडे नियम पाळा 
कोरोनाचा रंग आहे काळा ।

मुलं बाळं आता आहेत घरात
बघताहेत कशी वाकून दारात ।

काळजी घ्या काळजी करा
जातील हे दिवस धीर धरा ।
Sanjay R.

" हवा विसावा क्षणभर "

बघून वाट मी थकलो
हवा विसावा क्षणभर
मनात एकच आस आणि
होते लक्ष सारे वाटेवर ।
श्वासांनाही नव्हते कळत
जडला प्राण कुणावर ।
ज्योत ही विझली कधी
रात्रीला तो झाला जागर ।
गेले उडून प्राण जेव्हा
शब्दांचाच झाला गजर ।
Sanjay R.


Thursday, March 25, 2021

" पुन्हा ती वेळ यावी "

सरतात दिवस पुढे पुढे
आठवणी उरतात मागे ।

जाऊन जुने येती नवीन
अनायास जुळती धागे ।

आठवणींच्या त्या डोहामध्ये
क्षण गेलेले ते होती जागे ।

वाटे पुन्हा ती वेळ यावी
सुखकर मग ते जीवन लागे ।
Sanjay R.