Monday, March 22, 2021

" अवघा आनंद एक होतो "

असेल जेव्हा गोष्ट हिताची
अवघा आनंद एक होतो ।
नसता हित जयात ज्याचे
दुःख उराशी घेऊन रडतो ।

कधी अचानक नकार मिळता
कसा कशाला क्रोधीत होतो ।
पायी आपुल्या कुर्हाड मारून
संकट स्वतःवर ओढून घेतो ।

जीवन हे सुख दुःखाचे घर
हास्य मुखावर आनंद देतो ।
सारून बाजूस अति विचार
जगणे आपुले सुखात करतो ।
Sanjay R.

Sunday, March 21, 2021

" शल्य आहे मनात "

आठवण होता
जीव पडतो धाकी ।
शल्य आहे मनात 
अजूनही बाकी ।
आहेस कुठे तू
कोण तुला रोकी ।
झटकून विचार सारे
परत तू ये की ।
Sanjay R.

Saturday, March 20, 2021

" काहूर मनात "

झाली सांज वेळ
निघालेत सारे घरा ।
नशिबात का माझ्या
चाले उलटा फेरा ।

नाही घर दार ज्याचे
आयुष्यच दुःखाचा घेरा ।
शोधू कुठे मी माझा
आरशात जगाच्या चेहरा ।

शोधतो क्षण सुखाचे मी
भोवती दारिद्र्याचा पहारा ।
कणभर हवा मज आनंद
प्रयास त्यासाठीच सारा ।
Sanjay R.

Thursday, March 18, 2021

" भाव विभोर "

भावनांचा तुटला बंध
मन झाले विभोर ।

आठवणींचा नको आभास
जिवा लागे घोर ।

क्षणभर वाटे हवा थोडा विसावा
पण मन होते आतुर ।

एकांत वाटे मग हवा हवा
कधी मन होते फितूर

येती मनात किती विचार
डोळ्यात आसवांचा पूर ।

नको वाटे सारे आता
जावे कुठेतरी दूर ।
Sanjay R.


" रंग बरसे "

आली आली होळी आली 
चला लावू या रंग गाली ।

 हिरवा निळा लाल गुलाबी 
रंगांची तर बरसात झाली । 

दुर्गुणांची करून होळी 
आनंदाच्या पेटवू मशाली । 

नाचू गाऊ सारे आपण
 रंग उधळू वरती खाली ।
Sanjay R.