झाली सांज वेळ
निघालेत सारे घरा ।
नशिबात का माझ्या
चाले उलटा फेरा ।
नाही घर दार ज्याचे
आयुष्यच दुःखाचा घेरा ।
शोधू कुठे मी माझा
आरशात जगाच्या चेहरा ।
शोधतो क्षण सुखाचे मी
भोवती दारिद्र्याचा पहारा ।
कणभर हवा मज आनंद
प्रयास त्यासाठीच सारा ।
Sanjay R.
भावनांचा तुटला बंध
मन झाले विभोर ।
आठवणींचा नको आभास
जिवा लागे घोर ।
क्षणभर वाटे हवा थोडा विसावा
पण मन होते आतुर ।
एकांत वाटे मग हवा हवा
कधी मन होते फितूर ।
येती मनात किती विचार
डोळ्यात आसवांचा पूर ।
नको वाटे सारे आता
जावे कुठेतरी दूर ।
Sanjay R.
जगण्यासाठी चाले
हा सारा अट्टाहास ।
पैसे हवा की प्रेम
मनात कशाचा ध्यास ।
मोगरा फुलतो तेव्हा
दरवळतो दूर सुहास ।
जीवन आहे तर
घ्यावाच लागेल श्वास ।
श्रम परिश्रम करायचे
मनात सुखाचा ध्यास ।
जगू चला आज
मना सारखे ।
दिवस रोजचा तर
करतो मनास पारखे ।
मनात आशा आकांक्षा
वादळ विचारांचे सारखे ।
घडते कुठे मनातले
मग वाटे पोरके ।
Sanjay R.