मना मनाची उघडली दारे
शब्दवाचून कळले सारे ।
वर आकाशात चन्द्र तारे
मंजुळ ध्वनी नि वाहते वारे ।
आटणीचे ते वादळ सारे
तुटले बंध नाहीत पहारे ।
निरोप माझा घेऊन इशारे
आले परत उघडून दारे ।
ये ना सखे तू वेचू तारे
शब्दा वाचून कळले सारे ।
Sanjay R.
बघू नको वळून मागे
आहेत तिथे गुंतलेले धागे ।
सोडवताना सारा गुंता
सुटेल हा रस्ता मागे ।
अंधारातून होतो उजेड जेव्हा ।
चंद्रही लपतो सुर्या मागे ।
किलबिल होते पाखरांची
आणि जग होते सारे जागे ।
उठ जाऊ या त्या क्षितिजा पुढे
नसेल तिथे कोणीच मागे ।
चल जाऊ दोघेच आता
परत बांधु आयुष्याचे धागे ।
Sanjay R.