मन हे तर आहे कसे
गूढ विचारांचे भांडार ।
कधी येईल काय मनात
करील कोण त्याचा विचार ।
क्षणात बदले फेर आपला
नसे कशास कशाचा सार ।
होते कधी ते हळवे इतके
कधी करी मग अति बेजार ।
सरतो जेव्हा विवेक सारा
जडतो मनास कुठला आजार ।
कधी होती मग सिद्ध विचार
नसतो कुठेच कुठला प्रचार
विजयाचे मग वेध लागती
विसरून जाती सारे आधार ।
Sanjay R.
शोधतो जेव्हा मी
माझा मीच आरसा ।
दिसतो तसाच मी
फरक कुठे फारसा ।
आहे रूप माझे जसे
हाच माझा वारसा ।
तुमच्यातल्या माणूस मी
सांगतो मी माणसा ।
Sanjay R.
लागता तहान
शोधतो पाणी ।
बघू कशाला
विहीर खोदली कोणी ।
आत्मा होतो तृप्त
पिता घुटभर पाणी ।
कासावीस जीव
तहानेच्या क्षणी ।
व्याकुळ मन
स्तब्ध पापणी ।
दुःख असो वा आनंद
डोळ्यात पाणी ।
Sanjay R.
कोरोना काळात
घरातच होता निवास ।
घरात होते सारेच
नव्हता कुठला प्रवास ।
भीतीपाई साऱ्यांचेच
थांबले होते श्वास ।
बचाव होता करायचा
इम्युनिटीचाच ध्यास ।
बंधन होते किती
नव्हता कुणीच खास ।
वाचवायचे स्वतःला
फक्त तेच प्रयास ।
कमी झाला धोका
आता सोडला निश्वास ।
आले मग मनात
करावा दूरचा प्रवास ।
आनंदाचा क्षण तो
पंख मिळाल्याचा भास ।
भटकताना मिळाला
मोकळ्या हवेतला श्वास ।
Sanjay R.
रात्र रजनी ही सरली
बघा उषःकाल झाली ।
किरणांनी सूर्याच्या
न्हाऊन धरा निघाली ।
चिवचिव ती पाखरांची
गाणी मंजुळ झाली ।
झुळूक गार वाऱ्याची
गुलाब हसतो गाली ।
दूर कुठे तो नाद घंटेचा
फेरी भक्तांची निघाली ।
नामे विठ्ठलाचा नाद
भक्त तयाचे माऊली ।
Sanjay R.