" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Friday, February 12, 2021
" तहान "
लागता तहान
शोधतो पाणी ।
बघू कशाला
विहीर खोदली कोणी ।
आत्मा होतो तृप्त
पिता घुटभर पाणी ।
कासावीस जीव
तहानेच्या क्षणी ।
व्याकुळ मन
स्तब्ध पापणी ।
दुःख असो वा आनंद
डोळ्यात पाणी ।
Sanjay R.
" नव्हता कुठला प्रवास "
कोरोना काळात
घरातच होता निवास ।
घरात होते सारेच
नव्हता कुठला प्रवास ।
भीतीपाई साऱ्यांचेच
थांबले होते श्वास ।
बचाव होता करायचा
इम्युनिटीचाच ध्यास ।
बंधन होते किती
नव्हता कुणीच खास ।
वाचवायचे स्वतःला
फक्त तेच प्रयास ।
कमी झाला धोका
आता सोडला निश्वास ।
आले मग मनात
करावा दूरचा प्रवास ।
आनंदाचा क्षण तो
पंख मिळाल्याचा भास ।
भटकताना मिळाला
मोकळ्या हवेतला श्वास ।
Sanjay R.
Thursday, February 11, 2021
" उषःकाल झाली "
रात्र रजनी ही सरली
बघा उषःकाल झाली ।
किरणांनी सूर्याच्या
न्हाऊन धरा निघाली ।
चिवचिव ती पाखरांची
गाणी मंजुळ झाली ।
झुळूक गार वाऱ्याची
गुलाब हसतो गाली ।
दूर कुठे तो नाद घंटेचा
फेरी भक्तांची निघाली ।
नामे विठ्ठलाचा नाद
भक्त तयाचे माऊली ।
Sanjay R.
Wednesday, February 10, 2021
" नको उघडू ते दार "
नको उघडू ते दार
होतो डोक्याला भार
शांतीच जीवनाचा सार
हवा आपलाच आधार
साधा सरळ आचार
परोपकारी हवे विचार
मग होणार कशी हार
मनात उत्साहाचा बहार
Sanjay R.
Saturday, February 6, 2021
" विरह "
आई आणि बाबा
तुम्ही गेलात हो सोडून ।
दुःखी मन हे माझे
सुजले डोळे आता रडून ।
घडवले जडवले मज
दिवस कसे ते काढून ।
घासातला घास दिला
दिवस उपसात पाडून ।
पेन पाटी पुस्तक वही
नाही ठेविले कशास अडून ।
तापातही उशास बसून
काढल्या रात्री हात जोडून ।
क्षण शेवटचा जेव्हा तुमचा
बघितली वाट जीव तोडून ।
मीच काहो हा असा झालो
न भेटता गेले तुम्ही सोडून ।
Sanjay R.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)