Thursday, January 28, 2021

" पत्र लिहावं म्हटलं "

पत्र लिहावं म्हटलं तर
प्रश्न किती मनात ।
पेनच  कुठे ठेवलं आहे
येईना हेच ध्यानात ।
शधून शोधून थकलो शेवटी
सापडले एका खाण्यात ।
बसलो मग मी पत्र लिहायला
आठवेच ना काय ते मनात ।
दूर कुठून सूर आलेत
दंग झालो त्या गाण्यात ।
राहीलच शेवटी सारं लिहायचं
काही उरलच नाही ध्यानात ।
Sanjay R.


Wednesday, January 27, 2021

" मान सन्मान "

वर्ष 2021 च्या सुरवातीलाच मला माझ्या कवितांसाठी मिळालेला मान सन्मान 


" रात्र "

नेहमीचाच तिचा परिपाठ
अगदी वेळेवर ती येते ।
निजवून साऱ्या जगाला
हळूच निघून जाते ।

जाण्याने मात्र तिच्या
होतात सारे जागे ।
चंद्र आणि चांदण्या
असतात तिच्या मागे ।

नाते तिचे या धरेशी
बांधले अंधाराशी धागे ।
थकलेल्यास देण्या विसावा
येई रात्र उजेडाच्या मागे ।
Sanjay R.


" हरवली माणुसकी "

शोधू कुठे मी सांगा आता
खरच का हरवली माणुसकी ।
अब्जावधीची संख्या इथे
कुणातच नसेल का आपुलकी ।

कालच तर घडले दिल्ली दर्शन
रिकाम्या डोक्याची रिकामी खोकी ।
माणूस माणसावरच चवताळून येतो
माणुसकीच तिथे पडते फिकी ।

म्हणतात कुणी मला काय त्याचे
करेल मरेल काय उरेल बाकी ।
उद्धवस्त होतेय जीवनच आता
आहे हीच अंतयात्रेची झाकी ।
Sanjay R.



Tuesday, January 26, 2021

" काळ "

सांगून कुठे येतो
यणारा हा काळ ।
खोल करी घाव
असतो फक्त छळ ।
नसते त्याला कधीच

कुठली कशाची वेळ ।
अनावर दुःख देतो
कसा त्याचा खेळ ।
जातो तोडून सारे
आयुष्याचे मेळ ।
Sanjay R.