Wednesday, January 20, 2021

" बंधन "

जीवनच हे बंधन
मुक्त कोण इथे ।
पृथ्वीला सूर्याचे तर
झाडाला मातीचे ।
लेकराला मातेचे 
नि पोराला बापाचे ।
बहिणीला भावाचे
पत्नीला पतीचे ।
बंधनात बांधले सारे
मुक्त कुठे वारे ।
सागराला ही हो
आहेत ना किनारे ।
आकाशात बघा
आहेत चन्द्र तारे ।
दिवसा मात्र ते
होतात ना बिचारे ।
पवित्र तो धागा
बंधनात जरी सारे ।
मुक्तीच्या श्वासाला
सुटते बंधन सारे ।
Sanjay R.


Tuesday, January 19, 2021

" होणार आता शाळा सुरू "

होणार आता शाळा सुरू
चला मुलांनो तयारी करू ।

ड्रेस शाळेचा पुस्तक काढा
आठवतो का आता बेेेचा पाढा ।

आहेेेत कुठे ते शु आणी टाय
वह्या कोऱ्याच करायचे काय ।

सवय सुटली आता अभ्यासाची
तारीख जवळ आहे परीक्षेची ।

होमवर्क टर्मवर्क काय काय असेल
जुनी मजा तिथे नक्कीच नसेल ।

करू कसेही सगळेच म्यानेज ।
टीचर मित्र हवे मजला नॉलेज ।
Sanjay R.





" तुझे माझे नाते "

तुझे माझे नाते
एक प्रेमाचा बंध ।
मोहरलेला मोगरा
दरवळलेला सुगन्ध ।
नेहमीच मुखावर
फुललेला आनंद ।
नजरानजर होता
मनही होई धुंद ।
आठवतो तुला
आता तोच छंद ।
Sanjay R.

Monday, January 18, 2021

" दिमाखाचे झाले दही "

दिमाखाचे झाले दही
सुचतच नव्हते काही ।
छोटुश्या गोष्टी साठी
विचार होते काहीबाही ।
चुटकीसरशी सुटले सारे
हसत सुटलो हि ही ही ।
नेहमीच होतं असं जेव्हा
शोधू नका दिशा दाही ।
आरोग्यासाठी घातक हे
टेन्शन चिंता नको काही ।
Sanjay R.

Saturday, January 16, 2021

" कट्टी बट्टी "

कधी चाले कट्टी
परत होई बट्टी ।
लहानपणी मित्रांशी
असे अशीच गट्टी ।
तेव्हाही स्वभाव 
असायचा हट्टी ।
भावना निरागस
अविचारांना सुट्टी ।
मोठे झालोत आता
होते कधी कट्टी ।
पण विचार सरलेत
स्वभावही हट्टी ।
विसरतात सारं
घेत नाहीत बट्टी ।
आयुष्य सरते 
आणि होते सुट्टी ।
सुटते इथेच सारं
सोडा कट्टी बट्टी ।
Sanjay R.