शोधू कुठे मी
तू सांग जरा ।
नजर लागली
ये रे तू घरा ।
गेलास परदेशी
देश आपला बरा ।
जीवनात माझ्या
ही कुठली तऱ्हा ।
आसवं डोळ्यात
नशिबाचा फेरा ।
Sanjay R.
पाहू किती मी वाट
बघ अवनीचा हा थाट ।
बघून मज उभी इथे
वाराही झाला सुसाट ।
छेडतो मज का असा
काठ सागराचा अफाट ।
परतल्या या लाटा किती
घेऊन क्षणाची गाठ ।
येना सख्या रे तू परत
ओढ तुझी मनात दाट ।
सोबतीने तुझ्या संवे
बघेन रोज नवी प्रभात ।
Sanjay R.
बघून तुझ्या गालावर
गोड गुलाबी खळी ।
मनात माझ्या खुलली
जशी मोगऱ्याची कळी ।
सहजच मी गुणगुणलो
चार प्रेमगीताच्या ओळी ।
शब्दांना कुठले नव्हते बंध
तरी का ओठांना ते छळी ।
Sanjay R.
आवड होती वाचनाची
जायचो मी लायब्ररीत ।
वाचनापेक्षा मजा यायची
निरीक्षण तिथे करण्यात ।
निमित्तच असायचे वाचन
दिसायचं त्यांच्या वागण्यात ।
भाव डोळ्यातले त्यांचे
वेळ जायचा बघण्यात ।
वाटायचं मग मला जणू
लायब्ररीच आहे कादंबरी ।
तरुण्यातल्या त्या प्रेमाची
लघुकथाही तीच खरी ।
Sanjay R.