Wednesday, January 6, 2021

" आहेत ही मेंढरं "

एका मागे एक सारे
जशी आहेत ही मेंढरं ।
नाही उरले विचार
डोक्यात भिनल वारं ।
प्रवाह नेईल जिकडे
वाहते तिकडे सारं ।
नाही कशाला आधार
जीवन झाले भार ।
बदलले किती आचार
उद्धवस्त सारे संसार ।
थांबतो कोण आता
झेलू सारेच प्रहार ।
Sanjay R.




Tuesday, January 5, 2021

" चैन कुठे या मनाला "

हरली तहान भूक 
चैन कुठे या मनाला ।

सारखी येते आठवण
सांगू आता कुणाला ।

लक्ष लागेना कशात
ध्यास तुझा जीवाला ।

येना सखे तू परतून
नको थांबवू श्वासाला ।
Sanjay R.

Friday, January 1, 2021

" नववर्षाच्या शुभेच्छा "

सरली आता रात्र कालची
वर्ष नवीन  हे आले ।
घेऊ चला या झेप आकाशी
विसरा काल काय ते झाले ।
Sanjay R.


Thursday, December 31, 2020

" घड्याळ जीवनाचे "

कशाला हवे घड्याळ
आहेच कुणाला वेळ ।
जगताय ना जीवन
बसवा त्याचाच मेळ ।

बघा हा कोरोना
केला सगळाच खेळ ।
शिकलो म्हणतात किती
सगळीच तर होती भेळ ।

सोशल डिस्टनसिंग 
स्यानिटायझर शब्द न कळे ।
आपलेच गेलेत सोडून
अश्रूंनी ओले डोळे ।

वर्क फ्रॉम होम करा
लावा घराला टाळे ।
बंदिस्त होते श्वास
आत्माही कसा तळमळे ।

नोकरी धंदे किती बुडाले
उपाशी पोटात खळे ।
घर घर करत निघाले सारे
कोण कुणासाठी हळहळे ।

नवीन वर्ष येतंय आता
दिवसा मागून दिवस पळे ।
स्वछंद होऊन जगायचे आता
जुन्या वर्षाचे नकोच लळे ।
Sanjay R.


Wednesday, December 30, 2020

" नको आता एकांत "

घराबाहेर निघायचे
खूप झाला एकांत ।
कोरोना ने केला
जगण्याचा अंत ।

परत येतो म्हणे
परत मनात खंत
जगू दे ना आता
नको जीवन संथ ।

कुठला कोरोना
काय त्याचा पंथ ।
दूर हो ना आता
राहा तूच निवांत ।
Sanjay R.