Tuesday, December 29, 2020

" तू नसतांना "

नकोच ही कल्पना
नको हा विचार ।
फक्त तू आणि मी
हाच एक आचार ।

थोडं तू लाजावं
वळून मी बघावं ।
गालात तू हसावं
आणि थोडं रुसवं ।

वाट ही आयुष्याची
मिळून दोघे चालावे ।
क्षण सुख दुःखाचे
मिळून दोघात वाटावे ।
Sanjay R.


Monday, December 28, 2020

" श्रद्धा आणि विश्वास "

सांग माणसा तू जरा
तुझ्या जीवनाचे काय मोल
ढळू नको रे हा असा
सांभाळ जरा तू तोल ।

भरला बाजार कसा हा
मिरवण्यास तुज हवा ढोल ।
शब्द तुझे बाण विषारी
लक्षणांचा तू कर विचार खोल ।

आचार तुझे रे लयास गेले
झाले आयुष्य तुझे रे गोल ।
श्रद्धा सबुरी आणि विश्वास
विचार हे सारे नाहीत फोल ।
Sanjay R.


Sunday, December 27, 2020

" शिकली सवरली मुलगी घरी "

शिकली सवरली मुलगी घरी
जीवनात तुमच्या काय न करी ।

उंच उडायाचे स्वप्न तिचे भारी
जुनाट विचारांची तोडेल दोरी ।

आनंद उत्साह सदा असेल दारी
जणू अवतरली स्वर्गातली परी ।

सुखी संसाराची गोष्ट ही खरी
जीवनात तुमच्या येतील सरी ।

अखंड लाभेल लौकीकाची वारी
शिकलेली मुलगी दुःख सारे हारी ।
Sanjay R.

Saturday, December 26, 2020

" अंधारमय जगणं "

झोपडीत एका 
संसार चाले ।
आयुष्यच सारे 
लक्त्तर झाले ।

फकीर मी काय
नशीबात आले ।
पैश्या शिवाय
कुठे काय चाले ।

कष्ट करूनही
भरेना हे पोट ।
सांगा भविष्य
आहे कुठे खोट ।

शिक्षण पाणी
मुलं अडाणी ।
डॉक्टर विनाच
चाले दवापाणी ।

गरिबाच्या घरची
हीच कहाणी ।
अंधारमय जगणं
मरण क्षणो क्षणी ।
Sanjay R.

Friday, December 25, 2020

" मन बेधुंद "

मन विचारांचा सागर
अपुरी पडेल ती घागर ।
श्वासागणिक बदलते रूप
दिवस रात्र चाले जागर ।

कधी क्षणात होई  बेधुंद
देई उत्साह थोडा आनंद ।
दुःखी कधी ते निर्विकार
होई अंतरात मग बंद ।

सुटता ताबा मनाचा
विपरीत तयाचे वागणे ।
ठेऊन भान मनाचे
होई सुलभ हे जगणे ।
Sanjay R.