शांतीच भंग पावली
स्फोटक हे वातावरण ।
होईल कधीही युद्ध
स्वस्तच झाले मरण ।
अनाचार हिंसाचार
मूल्यांचेही हरण ।
कळत नाही काहीच
कुठले हे चरण ।
शोधावेच लागेल आता
लागेलच ना सरण ।
Sanjay R.
Tuesday, December 1, 2020
" स्फोट "
Monday, November 30, 2020
" लगन बाबूचं जुडलं "
पस्तिशीले टेकला बाबू
जुडेच न्हाई लगन ।
सारेच होते कंटायले
समजे न्हाई करा का लागन ।
एक दिस गावात आले बुवा
होते मने पुरं, जो जे मागन ।
बाबू धरून बुवाचे पाय म्हने
मायराज होईन कवा लगन ।
लय फिरलो गाव गाव
सांगा काय करा लागन ।
बुवा म्हने बाबुले जाजो पूर्वेले
तिकडं नशीब तुह खुलन ।
फकस्त धा दिस थांब
मंग होईन तुह मिलन ।
हरिक झाला बाबुले
म्हने होते आता लगन ।
चारच दिसात आले पावने
पोरगी पाहून जुयलं लगन ।
म्हने लय पावला मायराज
महा जमलं आता भजन ।
लयच खुश होता बाबू
ज्याले त्याला देये भाषन ।
तारीफ करे मायराजाची
म्हने किरपा त्यायचीच असन ।
Sanjay R.
Sunday, November 29, 2020
" कहाणी आसवांची "
नाही आयुष्याची कथा
आहे जीवनाची गाथा ।
कहाणी या आसवांची
ही जगण्यातली व्यथा ।
वनवासी झाला राम
ठरली गुन्हेगार सीता ।
घेतले उदरात शेवटी
धरती तिचीच माता ।
महाभारत घडले सारे
मान दौपदीचा रिता ।
वैकुंठाला पोचले सारे
रचल्या किती चिता ।
तीच भोगते दुःख सारे
किती विरोधी ही प्रथा ।
इतिहास या आसवांचा
झुकतो का इथेच माथा ।
Sanjay R.
Saturday, November 28, 2020
Friday, November 27, 2020
" नजरानजर "
नजरेचा खेळ सारा
भावते जेव्हा मनाला ।
वाटे परत बघावे
बघतो वळून कुणाला ।
घेतो डोळ्यात भरून
कळते ते श्वासाला ।
थांबून सोडतो निश्वास
मन सांगते हृदयाला ।
वाटते परत दिसावे
ओढ लागते विचाराला ।
गुंतते मन तिथेच
फुटे पालवी प्रेमाला ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)