Tuesday, November 10, 2020

" माहेरची दिवाळी "

मन गाभारा प्रसन्न
एक दिवाळीचा सण ।
आनंद फुलतो मनात
आला जवळ तो क्षण ।

लेक निघाली माहेरा
वाट पाही कोण कोण ।
आई बाप भाऊ बहीण
उभे दारात सारे जण ।

ओढ लागली घराची
आठवले घराचे आंगण ।
तुळसही बघते वाट कशी
नाही विसरली घर लांघन ।

आणली भावाने साडी
करेल लाडीगोडी बहीण ।
लाडू प्रेमाचा देईल आई
बाप डोळे भरून पहिण ।

सण दिवाळी आनंदाचा
जेव्हा येईल परत फिरून ।
माया विसरेल कशी लेक
येतील डोळे तिचे भरून ।
Sanjay R.



" जीव गुंतला तुझ्यात "

लागला ध्यास तुझा
मनात दर्शनाची आस ।
जळी स्थळी पातळी
होतात तुझेच  रे भास ।

टाकतो पाऊल पुढे
निरंतर चाले हा प्रवास ।
घालवू कसे आठवणींना
थांबेल तुझ्याविना श्वास ।

असावा सदा तू सोबत
चाले तेची सारे प्रयास ।
ये बा विठ्ठला तू आता
हवा तूच रे आम्हास ।

उघड दार  मंदिराचे
अंत नको रे तू  पाहुस ।
सांगतो तुला मनातले
जीव गुंतला तुझ्यात ।
Sanjay R.


Monday, November 9, 2020

" मास्क "

बघा चीनने केला कसा हो घात
घाबरली दुनिया बसली घरात ।

सगळीकडे पसरला कोरोना
ओरड दुनियेची एक सुरात ।

पद्धती जीवनाचीच बदलली
पाळतात दुरावा साऱ्या जगात ।

बाहेर निघताना घालायचा मास्क
ओळख साऱ्यांची दिसत नाही दात ।

ऑफिस झाले बंद शाळा ही बंद
जगच सारे थांबले एका क्षणात ।

हळूहळू आता होतंय सारं सुरू
तरीही आहे भीती किती मनात ।

सारेच संशोधक जोमाने भिडले
लवकरच येईल लस म्हणतात ।

सम्पव बाप्पा देवा आता हे सारे
हसू दे साऱ्यांना थांबलेल्या जगात ।
Sanjay R.


Sunday, November 8, 2020

" किरण आशेचा "

रोज चाले धावाधाव
यश कधी आपयश ।
न खचता चाले पुढे
ठेऊन मनाला खुश ।

मनी आशेचा किरण
दिसे समोरच प्रकाश ।
सर्वच सामावले इथे
वरती खुले आकाश ।

पुढे पुढे चालत राहा
करुन दुःखाचा विनाश ।
सुख दुःख येती जाती
होऊ नको रे निराश ।
Sanjay R.

Saturday, November 7, 2020

" आवडती जागा "

घरा विना कुठली जागा
आवडती या भूतलावर ।
जाईल माणूस कुठेही
लक्ष फक्त त्याचे घरावर ।

राजे रजवाडे असो किती
आवडते तर घरच असते ।
चार दिवस घेतो फिरून
नंतर मात्र घरच दिसते ।

हवे नको ते सारे जुळते
पैश्या शिवाय काय मिळते ।
घर परिवार असतो जिथे
प्रेम मात्र तिथेच मिळते ।
Sanjay R.