दिवसा मागून दिवस गेले
सांग जीवनात काय केले
आयुष्याचे अर्धे वर्ष
पाठ जीवनाचे शिकणे झाले ।
उरले सुरले सारेच वर्ष
पैसा पैसा करण्यात गेले ।
हसणे कधी रडणे कधी
यातच सारे रडगाणे झाले ।
पाहता पाहता अंत आला
जन्मभराचे जळणेच झाले ।
Sanjay R.
महाशिवरात्रीला दरवर्षी
भरते गावात जत्रा ।
गावोगावचे लोक येतात
गर्दीची असते यात्रा ।
महादेवाचे भक्त सारे
दर्शनाला रांगच रांग ।
मनोभावे टेकून माथा
धन्य होतात शिवांग ।
सर्कस आणि सिनेमा
सोबत असतो तमाशा ।
दुकानांन वर झुंबड गर्दी
कळत नाही कुठली दिशा ।
स्त्रियांना हवे बांगड्या तोंडे
माणूस बघतो आपले जोडे ।
चिंटू मींटी ला खेळणी हवी
विसरतात सारे रोजचे गाडे ।
Sanjay R.