Monday, June 22, 2020

" रीत प्रेमाची "

प्रेम कुठे अबोल असते
खूप काही ते बोलून जाते

हृदयाशी हृदय जोडून जाते
हितगुज मनाशी करून जाते

दोन मनं मिळतील जेव्हा
बंध आपसात जोडून जाते

एक दुसऱ्यात नसेल जरी नाते
प्रेमच प्रेमाला मिठीत घेते

जगावेगळी रीत ही प्रेमाची
अंतरात कशी फुलून जाते
Sanjay R.



Sunday, June 21, 2020

" बाप "

बाप नाव घेताच 
सुटतो थरकाप.....

भरकटलेलं मुल
होतं सरळ आपोआप...

मनात मात्र प्रेम आणि
करतो सुखाचा जाप....

उचलतो कष्टाचा डोंगर
लागली जरी धाप.....

घराचा आधार तोच
झुकते मस्तक आपोआप...
Sanjay R.

योग दिनाच्या शुभेच्छा

कराल जर योग
शिवणार नाही रोग
दुःख नाही भोग
करून बघा योग
Sanjay R.

Friday, June 19, 2020

" संपणार नाही प्रवास "

जीवन माणसाचे
आहे हा प्रवास ।
मनात उठती तयात
किती किती ते ध्यास ।

पळापळी चाले सारी
असती सारे प्रयास ।
हाप लागते धाप लागते
येतो फुलून श्वास ।

वाटे अर्धवट सारे
लागेल कसा कयास ।
दूर दिसती आपुले
निव्वळ सारेच आभास ।

सारे भुकेने व्याकुळ
सुटतो मुखतला घास ।
किती हा लोभ मनाला
नाही संपत हव्यास ।
Sanjay R.

Thursday, June 18, 2020

" राजकुमार "

सदा चाले डोक्यात 
विचारांवरती विचार ।
येयील एक राजकुमार 
होऊन घोड्यावरती स्वार
जाईल घेऊन दूर देशी
जन्माचा तो जोडीदार ।
करील जो प्रेम अपार 
देई आयुष्याला आधार ।
काय स्वप्नांचा तो सार
आनंदी मनाचा विचार ।
प्रत्येकीच्या मनातले
व्हावे स्वप्न हे साकार ।
Sanjay R.