Sunday, June 14, 2020

" मन हे बावरे "

मन हे माझे बावरे
किती आहे आस रे ।
वाटे त्यास कधी
 थोडा तू धाव रे ।
नको थांबुस मधे
पुढे पुढे तू चाल रे ।
होता हर्ष थोडा
खूप तू नाच रे ।
आयुष्य हे तर आहे
सुख दुःखाचे  घर ।
जग सुखात
दुःख दूर सार रे ।
Sanjay R.

Saturday, June 13, 2020

" वाट बघतो मी "

वाट बघतो मी
येना ग सखे तू 
छान पाऊस होऊन ।
अजूनही वाटतं
खूप खूप भिजावं 
सोबत तुला घेऊन ।
आजूनही आठवतो
तू आणि मी कसं 
घेतलं होतं न्हाऊन ।
मनातलं तुझ्या माझ्या
करू ते सारं सारं
जे गेलं होतं राहून ।
Sanjay R.

Friday, June 12, 2020

" शब्द दोन प्रेमाचे "

शब्द दोन प्रेमाचे
सांगू किती गुणाचे ।
घर मनात करती
नाते जिवाभावाचे ।

शब्दाशब्दात अंतर किती
दोनच शब्द करती क्षती ।
दोनच शब्द अंतरात
उजळी भावनांच्या वाती ।


शब्द गोड मधुर किती
त्यात शर्करेचे गोडावा ।
तोडती जे हृदयाचे बंध
हात तयासी जोडावा ।

भेद शब्दाशब्दात कसा
हवा मायेचा ओलावा ।
शब्दवाचून जे सार्थ होते
तो शब्दची तेथे टाळावा ।
Sanjay R.


Thursday, June 11, 2020

" गेल्या पडून सरी चार अंगणात "

गेल्या पडून सरी चार
अंगणात ।
गंध मातीचा पसरला
रोमारोमात ।
रातराणीने मिसळला
सुगंध तयात ।
दूड दुड धावती ढग
गगनात ।
सुर्याविनाच झाली आज
प्रभात ।
झुळ झुळ वाहे वारा गार
दस दिशात ।
गेला सांगून आज पाऊस
शिरला मनात ।
नवजीवन फुलेल आता
धरेच्या विश्वात ।
दिसती सारे रंग जीवनाचे
नव्या उत्साहात ।
Sanjay R.


" पहिला पाऊस "

आला आला पहिला पाऊस
भिजायचे होते भागली हाऊस ।

निळे आकाश झाले काळे
ढगांच्या मागे ढग ही पळे ।

सोबत होता गार वारा
हलती झाडे रिमझिम धारा ।

निसर्गाची ही लीला न्यारी
फुलले जीवन दिशा चारी  ।
Sanjay R.