Friday, June 12, 2020

" शब्द दोन प्रेमाचे "

शब्द दोन प्रेमाचे
सांगू किती गुणाचे ।
घर मनात करती
नाते जिवाभावाचे ।

शब्दाशब्दात अंतर किती
दोनच शब्द करती क्षती ।
दोनच शब्द अंतरात
उजळी भावनांच्या वाती ।


शब्द गोड मधुर किती
त्यात शर्करेचे गोडावा ।
तोडती जे हृदयाचे बंध
हात तयासी जोडावा ।

भेद शब्दाशब्दात कसा
हवा मायेचा ओलावा ।
शब्दवाचून जे सार्थ होते
तो शब्दची तेथे टाळावा ।
Sanjay R.


Thursday, June 11, 2020

" गेल्या पडून सरी चार अंगणात "

गेल्या पडून सरी चार
अंगणात ।
गंध मातीचा पसरला
रोमारोमात ।
रातराणीने मिसळला
सुगंध तयात ।
दूड दुड धावती ढग
गगनात ।
सुर्याविनाच झाली आज
प्रभात ।
झुळ झुळ वाहे वारा गार
दस दिशात ।
गेला सांगून आज पाऊस
शिरला मनात ।
नवजीवन फुलेल आता
धरेच्या विश्वात ।
दिसती सारे रंग जीवनाचे
नव्या उत्साहात ।
Sanjay R.


" पहिला पाऊस "

आला आला पहिला पाऊस
भिजायचे होते भागली हाऊस ।

निळे आकाश झाले काळे
ढगांच्या मागे ढग ही पळे ।

सोबत होता गार वारा
हलती झाडे रिमझिम धारा ।

निसर्गाची ही लीला न्यारी
फुलले जीवन दिशा चारी  ।
Sanjay R.


Wednesday, June 10, 2020

" साथ जन्माची "

जन्माला साथ मृत्यूची
आस मात्र जगण्याची ।

दिवसागणिक जाते आयुष्य
त्यातच काही करण्याची ।

श्वासा मागे श्वास चालती
चिंता कुठे ते थांबण्याची ।

दिवसापाठी येते रात्र
घाई सूर्याला उगवण्याची ।

दिवसभर मग चाले धडपड
करून काही उरण्याची ।

रोज असतो तसाच दिवस
इच्छा रात्र काळी टाळण्याची ।

अंत हे तर सत्य आहे
कहाणी होते जन्माची ।
Sanjay R.


Tuesday, June 9, 2020

" कुंकवाचा टिळा "

कुंकवाचा कपाळावर
छोटीसा टिळा ।
भासे जणू काही तो
त्रिनेत्राचा डोळा  ।
सौभाग्याचं लेणं त्यात
पतिव्रतेच्या ज्वाळा ।
बंधनांच वलय त्याला
प्रेमाचा ही लळा ।
रक्ताची लाली त्यात
शांतीची ही झळा ।
अनुसूयेची शक्ती आणि
भासे भक्तीचा मळा ।
Sanjay R.