Sunday, June 7, 2020

" रोटी कपडा आणि मकान "

आशा आणि आकांक्षा
मनात किती हे अरमान ।
जगायला तर हवे फक्त
रोटी कपडा आणि मकान ।

शिकून सवरून सकल
केले अर्जित समस्त ज्ञान ।
धावतो मागे पैश्याच्या 
वाटे त्यातच मोठी शान ।

पैसा पैसा लोभ किती
मोह माया मत्सर सोबती ।
लावले सर्वस्व पणाला
घेतली करून स्वतःची गती ।
Sanjay R.

Friday, June 5, 2020

" कशी ही माणसे "


ज्ञानाचे धनी म्हणता
कशी ही माणसे
निर्बुद्ध झालेत आता
सारीच ही माणसे ।
संस्कारच नाही उरले
झाली कशी माणसे ।
माणुसकीच विसरले
आता ही माणसे ।
निष्ठुर झाली किती 
आता ही माणसे ।
चटक लागली रक्ताची
राहिलीच कुठे माणसे ।
माणसालाच खातील
जनावर झाली माणसे ।
Sanjay R.


Thursday, June 4, 2020

" यादे "

हो आदत या नशा
कैसे जीए तुम्हारे बिना
कभी तुम जाना ना दूर
लागता हमे सुना सुना

चाहते तो हम भी यही
जाना ना तुम कही 
दिलमे देखो झाककर
अब भी तुम हो वही

पर छूट ना पाये हम
और ना यादे हुवी कम
दिलमे अरमान वही
चाहत वही तुम और हम
Sanjay R.

" का विसरलो आई मी तुला "

मी आईचा तानुला
काळजी कशाची मला ।
वढविले गर्भात तिने
आज नाही जागा तिला ।

कण कण भरविला
लहानाचा मोठा केला ।
तळहाताच्या फोडाहून
मज काळजीने घडविला ।

राहून अर्धपोटी तिने
लाड माझा पुरवला ।
रात्र रात्र जागून तिने
कसा सांभाळ केला ।

उशीर थोडाही होता
नजर असे वाटेवर ।
दुःख स्वतःचे विसरून
अर्पिले जीवन माझ्यावर ।

कसा विसरलो  मी
आले तिला म्हातारपण ।
दिले सोडून बेवारस
विसरलो तिचे समर्पण ।

वेळ येईल जेव्हा माझ्यावर
करू आशा मी कुणावर ।
कर्म माझेच असेल तेव्हा
जे कोपेल माझ्यावर ।
Sanjay R.


Wednesday, June 3, 2020

" झोप सुखाची "

उडून गेली दूर कुठे
झोप ही सुखाची ।
मिटून मी डोळे बघतो
वाट सांगू कुणाची ।

मन येते फिरून सारे
आकाशात जितके तारे ।
दूर उडवून घेऊन जाते
उरात वादळ आणि वारे ।

स्वप्नांची तर वाट लागली
दिवसालाही काळोख वाटे ।
दिवस रात्र तर एकच जणू
आभास होता, टोचती काटे ।
Sanjay R.