Saturday, May 30, 2020

" क्यू याद आती है "

क्यू याद मुझे आती है
मुझको यु सताती है ।

अब जाके कह दो उनको
यादोको भी याद सताती है ।

कहू किसे मै हु परेशान
सबकुछ वह तो जानती है ।

छोड दे वह अब जिद अपनी
खुदको भी क्यू सताती है ।
Sanjay R.

Friday, May 29, 2020

" त्या दोघी बहिणी "

दोघी दोघी कोण त्या
होत्या बहिणी बहिणी 
सीता आणि गीता 
आहे दोघींची कहाणी
दिसायच्या सारख्या
गफलत क्षणोक्षणी
सुंदरते सोबतच
सुरेख होती वाणी
गोड होता गळा
गायच्या त्या गाणी
विचारा काहीही
प्रश्न करा कोणी
उत्तर देत काव्यात
पाठ होत्या म्हणी 
सीता साधी भोळी
गीता महा गुणी
सहनशील सीता 
डोळ्यात तिच्या पाणी
हजरजवाबी गीता
उत्तर देई क्षणी 
सारेच घाबरायचे
नव्हते शत्रू कोणी 
लग्न होऊन जेव्हा
झाल्या त्या वहीनी
जुळ्या भावांच्या 
बायका दोघी बहिणी
आई वडील निश्चिन्त
मुली निघाल्या गुणी ।
Sanjay R.

Thursday, May 28, 2020

" शब्दांना असती पंख "

शब्दांना असतात पंख
जातात दूर ते वाऱ्यासंगे 
अंतरात करतात घर
चर्चाही त्यावर खूप रंगे 

आघात शब्दांचा हृदयावर
घेई दुःख तिथे आकार 
सहज कधी निघती शब्द
अर्थ तयाचे ते निराकार

कधी चकमक होई शब्दांची
शब्दाने शब्द मग वाढे 
राग द्वेष मोह मत्सर गुण सारे
अवतरती शब्दातून सारे तिढे 

माया ममता प्रेमाचे दर्शन
जाती शब्द सारेच सांगून 
भाव भक्तीचा शब्दातून येता
भक्तही जाई भावनेत रंगून ।
Sanjay R.

Wednesday, May 27, 2020

" नसेल कोणी मरणाला "

सांगा काय बोलणार 
आयुष्यावर....
निरबन्धच आलेत ना 
जगण्यावर.....

म्हणतात निघू नका
घराबाहेर.....
जायचे नाही
गावाबाहेर....

चुकून जरी गेलात तर
याद राखा.....
व्हाल तुम्ही कोरन्टीन 
चवदा दिवस.....

नजरेत लोकांच्या हो
कोरोना ग्रस्त.....
डोळ्यापुढे दिसेल मरण
झालेले स्वस्त.....

एकदा नेले जर तुम्हास
दवाखान्यात.....
डेथ सर्टिफिकेट मिळेल
घरच्यांच्या हातात....

मिळणार नाही खांदे चार
शेवटाला.....
दुसराच कोणी देईल अग्नी
नसेल कोणी मरणाला....
Sanjay R.

Tuesday, May 26, 2020

" आत्मविश्वास "

सम्पवू नको ही लढाई
जिकणार आहेस तूच
थोडासा धीर धर आणी
लढत राहा पूर्ण जिद्दीने
विजय तुझाच होणार
शत्रूचा विनाश होणार
ध्वजा विजयाची फडकणार
स्वतंत्र परत तू होणार 
संकटं सारीच टळणार 
दिवस जुने परत येणार
स्वप्न नव्हे हे सारे
सगळे तसेच घडणार 
Sanjay R.