Wednesday, May 13, 2020

" जायचे मज सहलीला "

येताच महिना मे
परीक्षांना होतो विराम ।

मुलं होतात फ्री
मिळतो थोडा आराम  ।

दरवर्षीप्रमाणेच
सहलीचा होता प्लान ।

परीक्षाच गेली वाया
व्यक्त कुठे झाले ज्ञान ।

वेळ चालला घरात
नाही कशाचेच भान ।

सहलीचा वाजला बाजा
उदास झालेत लहान ।

नाही शाळा नाही खेळ
होते चिडचिड मन ।

घरात आता बसू किती
जड जातोय एक एक क्षण ।
Sanjay R.




Tuesday, May 12, 2020

" सलाम करू या परिचरिकाना "

चला करू आज नमन
कर्तव्य निष्ठ परिचरिकाना ।
वसा घेतला अहोरात्र सेवेचा 
करू सलाम त्या सगळ्यांना ।

अनाचारी कोणी वा दुराचारी
भेदभाव हा नसे कुणाचा ।
शुश्रूषा करिती  मायेने
होऊन आधार त्या प्रेमाचा ।

नाही भाव कर्तव्याचा
अंतरात प्रण हा सेवेचा ।
राग लोभ ही नाही कुठला
त्याग बघा हा सर्वस्वाचा ।
Sanjay R.

Monday, May 11, 2020

" मन "

क्षण एक आनंदाचा
होईल तो सुखाचा ।
ठेऊन दूर दुःख मागे
दिवस आज जगायचा ।

दुःखा वीन सुख न कळे
विचार हा या मनाचा ।
क्षण भंगुर हे मन असे
थांग लागे ना कुणाचा ।

येतो कधी बहरन तर
सोसते कधी शुष्क वारा ।
अथांग सागराच्या मध्ये
क्षितिजा विना कुठे किनारा ।
Sanjay R.

Sunday, May 10, 2020

" अशी ही आई "

असेल मूल जरी कुठे
प्राण आई चा मुलात ।

असते प्रतीक्षा डोळ्यात
विचार त्याचाच अंतरात ।

सोसते दुःख सारे स्वतः
हवे मूल सदा सुखात ।

नसते काळजी जीवाची
प्राण वसे आईचा मुलात ।

नाते आईचे हे अनोखे
नसे दुसरे असे या जगात ।
Sanjay R.

Saturday, May 9, 2020

" गोंडस हास्य "

येईल कधी परत
मुखावरचे ते हास्य ।
झाले बंदिस्त घरात
सुखाचे ते रहस्य ।

कंटाळले बाळ गोपाळ
झाला कसा हा खेळ ।
मित्र नाही संगतीला
कसा घालवायचा वेळ ।

नाही शाळा नाही परीक्षा
वाटे भय किती मनाला ।
जो तो दिसे चिंतेत इथे
दुःख माझे सांगू कुणाला ।
Sanjay R.