Friday, May 8, 2020
" झाला संसार फाटका "
निघाला गावाकडे बाप
खांद्यावर पोर लागली धाप ।
माय चाले लगबग लगबग
उरात तिच्या जगण्याची धग ।
माय बाप पोर निघाले पाई
भुकेलेले पोट खिशात पैसा न्हाई ।
दिवस कठीण हे आले आता
नाही काम धाम , नाही कुणी दाता ।
का भोग असे हे आले नशिबी
आला कोरोना होती आधीच गरिबी ।
नाही यातून कुणाची सुटका
तुटका संसार होईल आता फाटका ।
Sanjay R.
Thursday, May 7, 2020
Wednesday, May 6, 2020
" चला जाऊ आता चंद्रावर "
चला जाऊ आता चंद्रावर ।
राहू तिथेच ,
नसतील निर्बंध जगण्यावर ।
अन्न पाणी वारा
मिळेल का सारं चंद्रावर ।
ऑनलाइन मागवू
बघू या थोडं अम्याझोन वर ।
गर्दी नसेल माणसं नसेल
औषधही मिळेल तिथे कोरोनावर ।
जीवनाची खात्री असेल
भरोसाच नाही आता या पृथ्वीवर ।
Sanjay R.
Tuesday, May 5, 2020
" मला तर वाटतं "
काय दिवस आलेत कळतच नाही.
चुकी कोण करतो आणि भोगतो कोण.
कशाचा काशाशीच संबंध नाही .
सगळेच बसले आहेत घरात.
भीती मरणाची इच्छा जगण्याची आहे ना यामागे .
जीवनाचाच हो खेळ झाला .
माहीत नाही जायचा कुणाचा आता वेळ झाला .
तरीही आशा आहे भविष्याची.
आस आहे जगण्याची .
इच्छा आहे काही करण्याची.
नियतीचा आहे हा खेळ .
जगणे मरणे त्याच्या हाती.
मलाच मी बघतो आता माझ्यासाठी.
दूरवर दिवा ना अजूनही जळतोय.
सांगतोय.....
मी विझणार नाही ....
आणी विझलो तरीही पहाटेला सूर्य उगवणार आहेच
परत प्रकाशाची किरणं घेऊन...
आणी सर्व प्रकाशमान होणार आहे.
जीवन हे असेच चालणार आहे.
आम्ही सारे या जीवनाचे स्तंभ आहोत.
आम्हीही जगणार आहोत जगवणार आहोत.
Sanjay R.
Monday, May 4, 2020
" वाट पाहू पावसाची "
सरली रात्र आणि
झाली कशी पहाट ।
आज सूर्याचा दिसतो
काही वेगळाच थाट ।
सकाळ पासूनचा क्रोध
उष्ण करून गेला वारे ।
झाली धरती तांबडी
अंग निघते भाजून सारे ।
गारवा सारून गेला
थेंब पाण्याचा सुकून गेला ।
निरभ्र झाले आकाश
ढगही दूर उडून गेला ।
वाट पाहू पावसाची
क्रोध सूर्याचा जाता ।
फुलेल हिरवळ सारी
ढग आकाशी येता ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)