Thursday, April 23, 2020

" घरीच राहा जाऊ नका बाहेर "

सगळेच आहेत घरात 
बघायचे उभे राहून दारात ।
महिना होत आला
भीती जीवाची मनात ।

बसून घरात हो आता आता 
बघायचा मोबाईल  टीव्ही ।
आदेश सगळे पाळायचे 
देईल जे जे हो तुमची देवी ।

खाऊन खाऊन वाढेल वजन
संभाळाल जरा थोडे पोट ।
कंट्रोल कराल खाण्यावर
समजू नका पोटाला मोट ।

जाईल कोरोना लवकरच 
नियम तुम्ही जर पाळाल ।
चढू जीवनाची शिडी परत
जर मोह आज  टाळाल ।
Sanjay R.


Tuesday, April 21, 2020

" का झालास तू वैरागी "

सोडून तू रे घरदार
का झालास वैरागी ।
सांग ना कुणासाठी
झालास तू असा त्यागी ।

काखेत झोळी तुझ्या
अंगावर वस्त्र एक भगवे ।
विचार आमचे कुत्सित
केले तुलाच रे नागवे ।

लोभ मोह माया मत्सर
सोडून तू असा निघाला ।
भावना क्रूर किती आमची
सम्पविले तुझ्या जीवाला ।

रक्षक झालेत  रे भक्षक
विश्वास करू मी कुणाचा ।
थांग लागणे कठीण रे
धगधगलेल्या या मनाचा ।

पेटली आहे आग आता
उरेल फक्त राख त्याची ।
माणूस मारेल माणसाला
लागली तहान रे रक्ताची ।

माणुसकीचा झाला अंत
कोण महात्मा कोण संत ।
रक्त पिपासू झालो आम्ही
नाही कसलीच आम्हा खंत

कोण निरपराध सांग इथे
अपराधी ही उन्मत्त झाला ।
भाव आता त्याच्या चरणी
तोच भोगी महान झाला ।
Sanjay R.

Monday, April 20, 2020

" सोडून जाताना "

विनाशक मीच विध्वंसक
सम्पवले रे मीच तुला ।
कोण तू कोण मी
विसरलो रे मीच मला ।

बघतो मी जेव्हा तुला
मीच माझा उरत नाही ।
सम्पवतो मी मारून तुला
मीच का रे मरत नाही ।

होतो भ्रमित बघून तुला
विचारांचाच हा असा भ्रम ।
सम्पेल हे विश्व सारे
पडणार नाहीत कुणास श्रम ।
Sanjay R.

Sunday, April 19, 2020

" माणुसकी उरली कुठे "

नाहीच उरली कुठे
माणसात हो माणुसकी
स्वार्थी झालेत सारे
नाही कुणात आपुलकी

मन झालं किती कठोर
निष्ठुरता भरली अंतरात ।
रडणे विसरला माणूस
नाही आसव डोळ्यात ।

पैसा पैसा हवा पैसा
नाही उरला भरवसा ।
माणूसच उरला कुठे
वागतो सैतान जैसा ।
Sanjay R.


Saturday, April 18, 2020

" पाप आणि पुण्य "

फळ कर्माचे इथे
पाप आणि पुण्य ।
मरणानंतर होते
सारेच एक शून्य ।

विचारांचा सार हा
पाप कुणास मान्य ।
करील जो पुण्य
जीवन त्याचे धन्य ।

सुख आणि समाधान
हेच पुंण्याचे निष्पन्न ।
दुःख आणि दारिद्र्य
रूप पापाचे सामान्य ।
Sanjay R.