Tuesday, April 14, 2020

" बाहुली "

उठताच सकाळी
व्हायचे लाड तिचे सुरू ।
आंघोळ, तेल कंगवा
पावडर गंध म्हणायची
मी काय काय करू ।

लाडकीच होती ती
बाहुली गोरी पान ।
नकटे नाक, गोबरे गाल
दिसायला होती छान ।

चाले सोबत जेवण
सोबत तिचाही आराम ।
मैत्रीण जिवाभावाची
खेळायचे एवढेच काम ।

हळूहळू दिवस लोटलेत
मी झाली मोठी नि ती लहान ।
कधीतरी साथ सुटली आणि
गेले अडगळीत तिचे ध्यान ।

आठवणी मात्र अजूनही आहेत
माझीच ती बाहुली ।
बालपणीची सखी तीच
होती माझी सावली ।
Sanjay R.





Monday, April 13, 2020

" मुख गालात हसते "

मनात जे वसते
डोळ्यात ते दिसते
नाते काय असते
अंतरात ते बसते 
भाव मुखास कळते
मुख गालात हसते 
Sanjay R.



Sunday, April 12, 2020

" स्त्री पुरुष समानता "

स्त्री पुरुष समानता
सरकारची यास मान्यता ।

सबलीकरणासाठी तिच्या
नियमातही आहे साम्यता ।

लढते जगते स्त्री सोबतीने
आहे यात जीवनाची धन्यता ।
Sanjay R.


Saturday, April 11, 2020

" अंतरातला विश्वास "

नातं असो वा गोतं
महत्वाचा तर विश्वास ।
नको घेऊस शंका
करू नकोस परिहास ।
कालही होता आजही आहे
अजूनही तोच ध्यास ।
विचार तू मनाला
तिथेही तोच आभास ।
तुझ्यात आणि माझ्यात
दूर आहे एक श्वास ।
तोडू नकोस असा
अंतरातला तू विश्वास ।
Sanjay R.

Friday, April 10, 2020

" बंदच झाली खरेदी "

दिवस कसे पालटले
बंदच झाली खरेदी ।
घरात बसून आता
मिळाली ना आजादी ।

लग्नाचा सिझन हा
असाच सम्पेल आता ।
परीक्षा निकाल सुट्ट्या
होईल सारीच कथा ।

आंबे कुरोडी पापड
सगळं फक्त आठवायचं ।
धैर्य आणि विश्वास 
सांभाळून सारं ठेवायचं ।

जातील हेही दिवस आता
नका घाबरू हो कशाला ।
येयील परत तोच आनंद
राहा  तयार आता जगायला ।
Sanjay R.