Thursday, March 19, 2020

" जगा..... होईल कधीही दगा "

कधी इबोला तर
कधी येतो कोरोना ।
जीवनाच्या या यात्रेत
व्हायरसचा हो रोना ।

खेळच आहे जीवन
बघता बघता जाते ।
क्षणही नाही लागत
सारे इथेच राहते ।

कालच तर बरे होते
काय हे असे झाले ।
नाती गोती, सम्पत्ती सारी
सोडून हो ते गेले ।

आहे असेच जीवनाचे
दिवस आजचा तुम्ही जगा ।
काय त्या मनात यमाच्या
देईल कधी तो दगा ।
Sanjay R.


Wednesday, March 18, 2020

" दुःखातही तिचे हसणे "

दुःख उरात किती सांगू कसे
जाऊ नको तू दिसण्यावर ।

बांधून दुःखाची मोळी ती
करते मात संकटावर ।

खोचून पदर कमरेला
काढते तोड जगण्यावर ।

स्त्रीच या घराचा आधार
अभिमान तिच्या असण्यावर ।

काळजातले पाणी तिच्या
नाही दिसणार डोळ्यावर ।

सुखी संसाराची किल्ली तीच
जाऊ नको तिच्या हसण्यावर ।
Sanjay R.


" हवा थोडा विसावा "

कामाचा डोंगर त्यात
घडीभराचा विसावा ।
सगळाच वेळ मस्त
कामात जावा ।
फुरसतिचा कधी
एकही क्षण नसावा ।
टेन्शन कामाचे पण
चेहरा हसरा दिसावा ।
पोटासाठी कष्ट सारे मात्र
वेळ आपला असावा ।
जीवन आहे असेच
त्यात हवा थोडा विसावा ।
Sanjay R.



Tuesday, March 17, 2020

" ओळख "

तुझ्याच हाती तुझी ओळख
सरत आहे आता काळोख ।
हो खंबीर , धीर नको सोडू 
अत्याचाऱ्यास दाखव तुझा धाक ।
जननी तूच ग या जीवनाची
अपराध्याची होऊ दे राख ।
Sanjay R.

" प्रेम बहिणींचे दृढ "

बहिणींच प्रेम
असते किती दृढ ।
नसते त्यात हो
कुठलेच गूढ ।
भावांच्या प्रेमाला
लागतो मूड ।
काही नाती तर
असतात फक्त सूड ।
आशय त्यांचा असतो
भुर्रकन रे तू उड  ।
डोक्याला भार
अंतरात तुड तुड ।
पाण्यातला बुडबुडा
खोलात जाऊन बुड ।
Sanjay R.