Wednesday, March 18, 2020

" दुःखातही तिचे हसणे "

दुःख उरात किती सांगू कसे
जाऊ नको तू दिसण्यावर ।

बांधून दुःखाची मोळी ती
करते मात संकटावर ।

खोचून पदर कमरेला
काढते तोड जगण्यावर ।

स्त्रीच या घराचा आधार
अभिमान तिच्या असण्यावर ।

काळजातले पाणी तिच्या
नाही दिसणार डोळ्यावर ।

सुखी संसाराची किल्ली तीच
जाऊ नको तिच्या हसण्यावर ।
Sanjay R.


" हवा थोडा विसावा "

कामाचा डोंगर त्यात
घडीभराचा विसावा ।
सगळाच वेळ मस्त
कामात जावा ।
फुरसतिचा कधी
एकही क्षण नसावा ।
टेन्शन कामाचे पण
चेहरा हसरा दिसावा ।
पोटासाठी कष्ट सारे मात्र
वेळ आपला असावा ।
जीवन आहे असेच
त्यात हवा थोडा विसावा ।
Sanjay R.



Tuesday, March 17, 2020

" ओळख "

तुझ्याच हाती तुझी ओळख
सरत आहे आता काळोख ।
हो खंबीर , धीर नको सोडू 
अत्याचाऱ्यास दाखव तुझा धाक ।
जननी तूच ग या जीवनाची
अपराध्याची होऊ दे राख ।
Sanjay R.

" प्रेम बहिणींचे दृढ "

बहिणींच प्रेम
असते किती दृढ ।
नसते त्यात हो
कुठलेच गूढ ।
भावांच्या प्रेमाला
लागतो मूड ।
काही नाती तर
असतात फक्त सूड ।
आशय त्यांचा असतो
भुर्रकन रे तू उड  ।
डोक्याला भार
अंतरात तुड तुड ।
पाण्यातला बुडबुडा
खोलात जाऊन बुड ।
Sanjay R.


Monday, March 16, 2020

" तुझा तोच चेहरा "

आठवतो अजूनही 
तुझा तोच चेहरा ।
सांग बदलू कशा मी 
अंतरातल्या मोहरा ।
नजरेतला तो भाव
आणि रुबाबदार तोरा ।
रंग असेल सावळाच
पण वाटायचा गोरा ।
शब्दही आठवतात
हृदयाच्या चोरा ।
बांधायचं होत मला
पण हरवला तो दोरा ।
Sanjay R.