Monday, March 9, 2020

" प्रवास हा एकट्याचा "

इति पासून अंता पर्यंत
प्रवास हा एकट्याचा ।
वाटेत प्रवासी बहुत
चाले संवाद अंतराचा ।

वाट ही वाळणांची
खाचा आणि खळग्यांची ।
घेऊनिया काळजी सारी
पदक्रांत ती करायची ।

दुःखाचे काटे कुठे
हाव सुखाच्या वाटेची ।
पडता पाऊल मधे 
होते दैना जीवनाची ।

जन्म मृत्यू दोन टोके
त्यात जाळी जीवनाची ।
प्रवास हा एकट्याचा
सोबत त्यात अंतराची ।
Sanjay R.



Sunday, March 8, 2020

" महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "

आई तू बहीण तू
पत्नी तू  पुत्री तू
आहेस तू नारी ।
अंबा तू जगदंबा तू
देवी तू,लक्ष्मी तू
हाती तुझ्या ग
जीवनाची दोरी ।
मैत्रीण तू , प्रेयसी तू
स्वप्नातली परीही तू
तूच आहे परोपकारी ।
Sanjay R.

Saturday, March 7, 2020

" अंतरात त्याच खुणा "

सांग ना मना
काय तुझी कामना ।
वाटते जे तुला
विचार तो रे जुना ।
छेडतो मज का
हा असा पुन्हा पुन्हा ।
छळणार रे तू किती
माझा काय गुन्हा ।
एकांत हा असा
वाटतो मज सुना ।
सांग निरोप माझा
जाऊन तू कुणा ।
वाट मी बघतो
अंतरात त्याच खुणा ।
Sanjay R.

" चला थोडे हसू "

चला थोडं हसू
नका कोपऱ्यात बसू ।

जगायचंना जीवन तर
असे नका रुसू  ।

दाखवा थोडे दात
नका दुःखात असे फसू ।

शोधून थोडा आनंद
छान छान थोडे दिसू ।
Sanjay R.

Friday, March 6, 2020

" कल्पनांची वाहती नदी "

लेखणी तर आहे माझ्या
कल्पनांची वाहती नदी ।
विचारांचा डोंगर पाठी
काठावर हिरवी वादी ।

बांधून पाट मी त्यावर
करतो गोळा शब्द थोडे ।
लिहिते लेखणी माझी
काव्य रचनेचे धडे ।

प्रतिक्रिया वाचकांच्या येता
मन होते आनंदाचा फुलोरा ।
दरवळतो चहूकडे सुगंध
बदलतो चेहऱ्यावरचा तोरा ।
Sanjay R.