Saturday, March 7, 2020

" अंतरात त्याच खुणा "

सांग ना मना
काय तुझी कामना ।
वाटते जे तुला
विचार तो रे जुना ।
छेडतो मज का
हा असा पुन्हा पुन्हा ।
छळणार रे तू किती
माझा काय गुन्हा ।
एकांत हा असा
वाटतो मज सुना ।
सांग निरोप माझा
जाऊन तू कुणा ।
वाट मी बघतो
अंतरात त्याच खुणा ।
Sanjay R.

" चला थोडे हसू "

चला थोडं हसू
नका कोपऱ्यात बसू ।

जगायचंना जीवन तर
असे नका रुसू  ।

दाखवा थोडे दात
नका दुःखात असे फसू ।

शोधून थोडा आनंद
छान छान थोडे दिसू ।
Sanjay R.

Friday, March 6, 2020

" कल्पनांची वाहती नदी "

लेखणी तर आहे माझ्या
कल्पनांची वाहती नदी ।
विचारांचा डोंगर पाठी
काठावर हिरवी वादी ।

बांधून पाट मी त्यावर
करतो गोळा शब्द थोडे ।
लिहिते लेखणी माझी
काव्य रचनेचे धडे ।

प्रतिक्रिया वाचकांच्या येता
मन होते आनंदाचा फुलोरा ।
दरवळतो चहूकडे सुगंध
बदलतो चेहऱ्यावरचा तोरा ।
Sanjay R.

Thursday, March 5, 2020

" आठवते अजून ती संध्याकाळ "

दिवसभराची करून परिक्रमा
सूर्यही निघाला अस्ताला ।

अशीच ती रम्य संध्याकाळ
लागले तांबडे पसरायला ।

पक्षी शोधती घरटे आपुले
ओढ लागली मनाला ।

मनात उत्साह भरलेला
आनंद चेहऱ्यावर बहरलेला ।

सायंकाळ तुझ्या माझ्या भेटीची
आठवतो प्रसंग घडलेला ।

मन मनात गुंतलेलं आणी
हात हातात गुंफलेला ।

अबोल होते शब्द जरी ते
कळले सारेच अंतराला ।

जवळ येउनी एक झालो
श्वासात श्वास मिळालेला ।

अवतरल्या मग दूर चांदण्या
लागल्या चम चम चमकायला ।

तुझे माझे नाते जुळले 
लागले जीवन फुलायला ।
Sanjay R.

Wednesday, March 4, 2020

" बंदिस्त तुझे विश्व "

बंदिस्त तुझे विश्व
या खिडकीच्या आड ।
टाक उपटून ते गज
वृक्ष बंधनाचा तू पाड ।

निरभ्र झाले आकाश
वरून सूर्य डोकावतो ।
क्षितिज हे दूर किती
पक्षी गगनात झेपावतो ।

ये तुही बाहेर जरा
मोकळ्या या हवेत ।
घे भरून श्वास थोडे
आनंद तुझ्या कवेत ।
Sanjay R.