कधी सुख कधी दुःख
ही वाट आयुष्याची आहे ।
पिकली पानं पडतात गळून
हेच जीवनाचे सत्य आहे ।
धीर धर ना थोडा जरा
जीवनात बहार येणार आहे ।
आयुष्याचे हेच चक्र
आसव डोळ्यातले हसणार आहे ।
Sanjay R.
Friday, February 28, 2020
" बहार पुन्हा येणार आहे "
Thursday, February 27, 2020
" माय मराठी होय मराठी "
अति विशाल आहे
मराठी ची गाथा ।
लहानपणी ऐकायचो
मराठीतच कथा ।
ज्ञानेश्वर तुकाराम
मराठीचे स्तंभ ।
अंतरात केले घर
वाचू किती अभंग ।
मोठमोठे साहित्यिक
नावे आहेत कितीतरी ।
झेंडा मराठीचा त्यांनी
झळकवला उंचावरी ।
Sanjay R.
Wednesday, February 26, 2020
" डोळ्यात तुझ्या आसू "
नाकावर तुझ्या रागआणि
डोळ्यात नेहमीच आसू ।
तू ग माझे लाडके
आहे बाई रुसू ।
कळतं मला पण
कसं येतं तुला हसू ।
डोळे मिचकावले की
वाटते ग तू सासू ।
नेहमीच हसत राहा
आणू नको असू ।
Sanjay R.
" तू रे असाच शिकत राहा "
शिकून सवरून मोठा झाला
हाच तर तू रे गुन्हा केला ।
मोल मजुरीचे सारेच रस्ते
बंद तू रे करून आला ।
नोकरी हवी चाकरी हवी
स्पर्धेपाई ती मिळेना तुला ।
उद्योग धंदे नाही रे सोपे
पैश्या विना हलत नाही झुला ।
घे शिकून परत आता
लाव दहा वीस तू डिगऱ्या ।
वर्षोन गनती तू शिकत राहा
सरकारला पण रे तेच हवे ।
Sanjay R.
Tuesday, February 25, 2020
" पदर डोक्यावर "
तिचा पदर तिची आहे लाज
सांभाळते ती त्यात तिचा साज ।
जेव्हा लेकरू असे कडेवर
सुख देउ त्यासी तिचा पदर ।
ऊन पाऊस करे जेव्हा मारा
डोक्यावर पदर देई गार वारा ।
पाहून एकटी लोक करी इशारा
एकटा पदर सांभाळी सारी धुरा ।
मान सन्मान लाज आणि लज्जा
कवच सुरक्षेचे देण्या पदर सज्ज ।
स्त्री चा पदर आहे तिचे सर्वस्व
सारेच जाणती आहे त्याचे वर्चस्व ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)