एक अंधारी रात्र
असावी अमावसेची ।
आकाशात चांदण्या
दाटीवाटीने बसलेल्या ।
मधेच एखादा काजवा
चमचम करत निघून जातो ।
थंड गार वातावरणात
दूर एक शेकोटी पेटतेय ।
दूर असूनही तीची
मनाला जाणवत होती ऊब ।
मधेच कुठेतरी झाडावर
फडफड व्हायची पक्षाची ।
रातकिड्यांचा आवाज
शांततेला बसू नव्हता देत स्वस्थ ।
अशीच निघाली रात्र आणि
मग दिली कोंबड्यांने बाग सूर्याला ।
हळूच अवतरला सूर्य
आणि सरले साम्राज्य अंधाराचे ।
Sanjay R.
Friday, February 7, 2020
" हिवाळ्यातली ती रात्र "
Wednesday, February 5, 2020
" एकच प्याला "
अशी कशी रे ही दारू
सवयीचा तू गुलाम झाला ।
उठून सक्काळी कसा
हवा तुला रे एकच प्याला ।
घरदार शेती वाडी गेले सारे
संसाराचाही घात झाला ।
एक घुट पिण्यासाठी रे
भीक मागायचा दिवस आला ।
विनाशाचा मार्ग तुझा
डोक्यात तुझ्यारे अंधार झाला ।
कळेल कधी सांग तुला
यमराज तुझ्या रे दारी आला ।
Sanjay R.
Tuesday, February 4, 2020
" गरीब आमचे गाव "
गरिबी जिथे वसते
ते असते गाव ।
सुविधांचा तर असतो
नेहमीच तिथे आभाव ।
मोडक्या तोडक्या जागी
जमिनीवर चाले शाळा ।
मास्तर नाही आले तर
उघडतच नाही ताळा ।
नाही डॉक्टर दवाखाना
गळा पकडतो आजार ।
गरज पडली तरी बघा
नसतो कशाचा बाजार ।
फाटकं तुटकं घालायचं
कसं तरी पोट भरायचं ।
दिवसभर शेतात काम
मरेस्तोवर करायचं ।
थंडी असो वा पाऊस
आडोशाला निजायचं ।
सरेल दिवस तेव्हा ना
चटकन तसच मरायचं ।
Sanjay R.
" ओळख अनोळखी झाली "
ओळख तुझी माझी
बघ जुनी किती ती
अनोळखी आता झाली ।
मान बाजूला करून तू
आजच दूर तू
का ग अशी निघून गेली ।
आठव तो दिवस परत
होता नजरानजर जेव्हा
काळीज तू घेऊन गेली ।
मोह परत बघण्याचा
सांगून मनास माझ्या
ओढ किती तू लावून गेली ।
मनात भावना माझ्या
व्याकुळ अजूनही तशाच
साऱ्याच उलथून गेली ।
लावू नको परत आता
हुरहूर या जीवाला
पालवी प्रेमाची सरून गेली ।
Sanjay R.
" कशी ही अंधश्रद्धा "
श्रद्धा हीच आमची
या जीवनाचा पाया ।
अंधश्रद्धा आमची
जाते जीवन वाया ।
श्रद्धे विना काय उरते
पुढ्यात मोह माया ।
राग लोभ द्वेष मत्सर
अंतरातल्या छाया ।
पळापळ चाले नुसती
थांबते कुठे काया ।
सारून दूर जायचे
सुखी जीवन कराया ।
Sanjay R.