
बघा जरा....
लय झालं जेवण
मुन टाकलं आंग ।
दोस्त आले सपनात
म्हने जाचं कुठं सांग ।
इचार केला थोडा
मनलं जाऊ भूत पाहाले ।
भेता का लेकहो
झाले आडदांड काहाले ।
झाले मंग सरळ
म्हने जाऊ भुताच्या घरी ।
घेऊ शोध जरासा
गोष्ट हाये का खरी ।
गेलो मंग सारेच
हाये तिकडं दरी ।
संग वंग होते सारे
पन भेव वाटे तरी ।
जवा पोचलो तेथ
अंधार लय भारी ।
पांढरे कपडे घालून
होती नाचत परी ।
झुंन झुंन तिचे चाळ वाजे
मनलं गोठ हाये खरी ।
बायको हालवे जोरात
पायतो त मी घरी ।
Sanjay R.
तुटला धागा
विखुरले मणी
वेचू कसे मी
सांगा ना कोणी ।
धो धो पाऊस
पडतंय पाणी ।
सुचतात कशी
पावसाची गाणी ।
फुलते अंगणात
रात राणी ।
दरवळतो गन्ध
रात्र दिवाणी ।
निशब्द झाली
मुखातली वाणी ।
ऐकायची आता
विरहाची गाणी ।
Sanjay R.
लहानश्या वयात
अभ्यासाचा डोंगर ।
पुस्तकांचे ओझे
शाळा कॉलेजचा नांगर ।
लेखन वाचन घोकमपट्टी
शिक्षकांचा मार ।
आई बाबांची कटकट
होम वर्क चा भार ।
रोजच असते परीक्षा
लिहा अभ्यासाचा सार ।
25 वर्षे अशीच जातात
जीवन तार तार ।
मिळते शेवटी डिग्री
मानायचे कुणाचे आभार ।
नोकरीसाठी मग
फिरायांचे दारोदार ।
जीवनच सरते सारे
नाही कशाचाच आधार ।
जिवंतपनी मरणाचे
झेलायचे नुसते वार ।
Sanjay R.
चीन मध्ये झाला लोचा
पसरला सगळीकडे कोरोना व्हायरस....
माणसांवर आली मोठी आफत
वाचायचे कसे यातून उत्तर सांगा बस....
गंभीर हा आजार किती
डॉक्टर सारे मिळून शोधताहेत लस.....
हवेच्या वेगाने पसरतोय आजार
मरणाऱ्यांची संख्या वाढतेय छातीत होते धस्स....
Sanjay R.