येते आठवण ।
मनात भावनांची
होते साठवण ।
गुंतत जातं मग
विचारी मन ।
बंधनाच्या परिघात
अधीर होतो क्षण ।
Sanjay R.

तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.
आली संक्रांत
तीळ गूळ घ्या ।
नसेल बोलायचे तर
तीळ साखर द्या ।
शेंगा बोराचं
वाण मोठं भारी ।
स्त्रिया मिरवायला
जातात शेजारी ।
चिंगी आज खुश
होणार तिची लूट ।
वातावरणात गारवा
पप्पाना हवी सूट ।
संक्रांत आली
घेऊन आनंदी रंग ।
बंटी ही आपला
पतंग उडवण्यात दंग ।
Sanjay R.
गोड आंबट बोरं
वेचत होती पोरं ।
बालपण आठवलं
आलं डोळ्यापुढे सारं ।
घुसून कुणाच्या शेतात
तोडायचे पेरू आणि बोरं ।
कळलंच कुणाला तर
तयार खायला मार ।
मजा यायची खूप
सम्पलं आता सारं ।
Sanjay R.
तू बोलूच नको
मला आता बोलायचं आहे ।
तू बघूही नको
मला पण बघायचं आहे ।
काय करू काय नको
सगळंच तर करायचं आहे ।
वेळ नाही आता
अजून थोडं हसायचं आहे ।
लहानाचा झालो मोठा
मोठं अजून व्हायचं आहे ।
तो तिथं दारात उभा
खरंच का मरायचं आहे ।
नको नको थांब थोडा
जाऊन पुढे यायचं आहे ।
असलास तू मृत्यू जरी
थोडं मला जगायचं आहे ।
Sanjay R.