Friday, December 20, 2019

" माणसापुढे माणूस लाचार "

कोण कुणाचा आधार
माय बाप ही वाटे भार ।

बदलले सगळेच आचार
अंतरात या कुठले विचार ।

झाले पुसट सारे उपकार
माणसाचाच होतो प्रहार ।

काळजाला विकृत आकार
जडत चालला हा विकार ।

जगतो करून तो दुराचार
माणसापुढे माणूस लाचार ।
Sanjay R.

" आसवही आहेत भिजण्यास आतुर "

एकटा असतो मी जेव्हा
विचारांचं उठतं मनात काहूर ।

वाढते गती श्वासांची आणि
भिर भिर नजर मग होते स्थिर ।

शोधतो काय आकाशात पण
बघत बसतो क्षितिजा आड दूर ।

कळतच नाही मग येतो कसा
डोळयांच्या कडेला आसवांचा पूर ।

अंतराळात गवसतो एकटाच नभ
टाकतो देऊन त्यास मी माझा सूर ।

मग वाट बघतो मी पावसाची
आसवंही आहेत भिजण्यास आतुर ।
Sanjay R.

" थंडी "

पहाटेला उठावे तर
वातावरण थंड ।
वाटतं झोपावं अजून
मन करतं बंड ।

सहा वजताही बाहेर
अंधारच असतो ।
सूर्याची वाट बघत मग
चहा पीत बसतो ।

चिमण्यांची चिव चिव
होते मग सुरू ।
कुडकूड करत वाटतं
कसा मी फिरू ।

रजई देते हाक मला
घे थोडं पांघरूण ।
पहाटेची स्वप्न येतात
का कुणाला सांगून ।

स्वप्न अशी खरी होतात
बघ तू जरा ।
फिरून गार गार थंडीत
होशील का बरा ।

निघाला सूर्य की मग
उन्हात तू बस ।
अनुभव ना जरा तू
जीवनाचा रस ।
Sanjay R.

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य सम्मेलन अमरावती ला

चला, अखिल भारतीय वर्हाडी साहित्य सम्मेलनाला जाऊ या ।

Saturday, December 14, 2019

" म्हातारपण "

सरतो आहे पुढे पुढे
आयुष्याचा एक एक टप्पा ।

सुटत चालली एक एक कडी
कोण उरेल करायला गप्पा ।

मी मी म्हणणारा प्रत्येक जण
तू चा घेतोय आधार ।

पेलवत नाही बघा आता
म्हातारपणाचा भार ।

कठीण किती जीवन हे
दिसे अंताला जीवनाचा सार ।

वाट बघतो बघत आकाशी
नेतील कोण मला चार ।
Sanjay R.