Tuesday, October 15, 2019

" चार ओळी "

चार ओळी

(1)
जंजिर से बांधे
वह कैद होती है ।
बंधन हो दिलका
वह तो प्यार होता है ।

(2)
बंधन एक धागेका
तुटता है जरूर ।
दिल तूट जाये तो
कहेना दिलका कसूर ।

(3)
असेल शब्द तीक्ष्ण हत्यार
करतही असतील ते घायाळ ।
पण तितकीच ताकद त्यांची
बघा बोलून थोडे मधाळ ।

(4)
शांतता असतो
एक संकेत वादळापूर्वीचा ।
हवे कशाला वादळ
नकोच त्रास मग शांततेचा ।
Sanjay R.

Monday, October 14, 2019

" शरद पौर्णिमा "

निघाला चंद्र जेव्हा
भ्रमणाला आकाशात ।
खुदकन हसली चांदणी
गोड कशी गालात ।

मात्र चंद्र होता तेव्हा
आपल्याच नादात ।
दिवस शरद पौर्णिमेचा,
सारेच किती आनंदात ।

निरखत होता चंद्र
रूप चांदणीचे दुधात ।
दुधाचे झाले अमृत
हसली चांदणी गालात ।
Sanjay R.

Saturday, October 12, 2019

" प्लास्टिक विना भारत स्वच्छ "

स्वप्न एक आमचे
भारत स्वच्छ ।
करायचे प्लास्टिक
इथून गच्छ ।

प्लास्टिकचे जीवनात
स्थानच उच्च ।
मग प्लास्टिक
आहे कुठे तुच्छ ।

शोधा पर्याय
कुठला तरी अच्छा ।
मगच सांगा.......
प्लास्टिक सोडा
करा भारत स्वच्छ ।
Sanjay R.

Thursday, October 10, 2019

" दहन रावणाचे "

झाले दहन रावणाचे
प्रतीक ते कुविचारांचे ।
धडे गिरवले संस्कारांचे
भूत मात्र तिरस्काराचे ।

माया सगळी धनाची
नाही ममता मनाची ।
विणतो जाळे स्वार्थाचे
काय कुणास कुणाचे ।

पाप पुण्य सारे सरले
मोह मत्सर फक्त उरले ।
देह इथले माणसाचे
होते दहन माणुसकीचे ।
Sanjay R.

" बांध फुटतो मनाचा "

दिवसा मागून दिवस जातात
मनाला मनाचे कळत नाही ।
जाग येते सूर्याला आणि
तेव्हाच सुरुवात होते काही ।

आठवणींचा मोठ्ठा पसारा
सहजच येतो मग पुढ्यात ।
एकच थेंब पाणी कसे
वसते डोळ्याच्या घड्यात ।

अंतरातली जखम खोल
सहजच दुखावते कधी ।
वाहू लागते भळभळून
बांध मनाचा फुटतो आधी ।
Sanjay R.