Thursday, October 3, 2019

" प्रतिक्षा "

जीवन आहे परीक्षा
असावी यशाची अपेक्षा ।

अपयश बाजू दुसरी
करायची थोडी प्रतीक्षा ।।

यश आपुल्या हाती
सोडा सारी निराशा ।

विजयी होऊच नक्की
घ्या मनाशी हीच दीक्षा ।।
Sanjay R.

Saturday, September 28, 2019

" बुरखा घुंघट "

बुरखा घुंगट
हवा कशाला ।
उन्हापासून
सौरक्षणाला ।

खवखवणार्या
नजरा किती ।
त्यांच्यापासून
कशी ही भीती ।

पूर्वा पारची
ही पद्धत कशी ।
स्त्री ला झाकून
ठेवायचे जशी ।
Sanjay R.

" आसवं अनमोल "

नको इतकी हळवी होऊस
येतो झर झर कसा पाऊस
आसवं ही आहेत अनमोल
दूर नको तू अशी जाऊस ।
Sanjay R.

Friday, September 27, 2019

" चित्र काव्य "

चित्र काव्य

" कथा भावनांची "

करू कविता मी कशाची
हास्याची की आसवांची ।

शब्द जोडुनी होते कविता
मनातल्या विचारांची ।

मन होते व्यथित जेव्हा
होते बरसात अश्रूंची ।

सरसावतात पुसण्या हात
व्यथा काय ओल्या गालांची ।

आनंदाची किमयाच न्यारी
गाली लकीर हास्याची ।

मन सांगे मनास कसे ते
कथा सारी या भावनांची ।
Sanjay R.