चित्र काव्य








करू कविता मी कशाची
हास्याची की आसवांची ।
शब्द जोडुनी होते कविता
मनातल्या विचारांची ।
मन होते व्यथित जेव्हा
होते बरसात अश्रूंची ।
सरसावतात पुसण्या हात
व्यथा काय ओल्या गालांची ।
आनंदाची किमयाच न्यारी
गाली लकीर हास्याची ।
मन सांगे मनास कसे ते
कथा सारी या भावनांची ।
Sanjay R.
फुलला आज गुलाब
पाकळ्यांना नाही गंध ।
मोगराही रुसलेला का
नाही पसरला सुगंध ।
गारवा थोडा हवेत
वाटे मनास धुंद ।
सोड रुसवा सखे तू
नेहमीचाच तुझा हा छंद ।
कोमेजला किती बघ
फुललेला निशिगंध ।
हसून बघ ना जरा
चाफा होईल बेधुंद ।
Sanjay R.
लागली आज संचारबंदी
कमी झाली मनातली रुंदी ।
नाही ही कुठली धुंदी
अंतरात अंतरालाच बंदी ।
वाटे जणू हृदयावर बंदी
ओठांवर शब्दांची मंदी ।
काढून सोने लावली चांदी
हलते मान जसा हा नंदी ।
Sanjay R.